• Fri. Nov 15th, 2024

प्लास्टिक मुक्तीचा नारा देत विद्यार्थ्यांनी साकारले रंगीबेरंगी आकाश कंदील

ByMirror

Oct 20, 2024

शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम

दिवाळीत घरांवर झळकणार विद्यार्थ्यांनी बनवलेले आकाश कंदील

नगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची दिवाळीनिमित्त स्वदेशी व प्लास्टिक मुक्तीचा नारा देत आकर्षक रंगीबेरंगी कागदाचे पर्यावरणपूरक आकाश कंदील तयार केले. या दिवाळीत चायनाचे आकाश कंदील न वापरता स्वत: तयार केलेले आकाश कंदील, पणत्या वापरण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.


कार्यानुभव कार्यशाळेतंर्गत विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी आकाश कंदील बनवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सर्व शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सुंदर व कल्पकतेने, वेगवेगळ्या टाकाऊ वस्तूंचा व क्राफ्ट पेपरचा वापर करून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवले. या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.


प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. माध्यमिकच्या प्राचार्य छाया काकडे यांनी दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमासाठी विभागप्रमुख सुजाता दोमल यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. या कार्यशाळेत मिरी हायस्कूलचे कला शिक्षक संतोष कदम व शिक्षिका शिल्पा कानडे यांनी विद्यार्थ्यांना आकाश कंदिल बनविण्याचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. उपस्थित शिक्षकांनी एकत्रितपणे भव्य आकाश कंदिल साकारले. हे आकाश कंदिल शाळेच्या प्रांगणात लावण्यात आले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उर्मिला साळुंखे, मीनाक्षी खोडदे, शितल रोहोकले, जयश्री खांदोडे, सोनाली अनभुले, भाग्यश्री लोंढे, रूपाली जाधव, पुनम घाडगे, इंदुमती दरेकर, रूपाली पांडुळे यांनी परिश्रम घेतले.


विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा व त्यांनी बनवलेल्या वस्तूंपासून दिवाळी साजरा करण्याचा आनंद मिळण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाला घातक ठरणारे प्लास्टिकचे आकाश कंदीलवर पर्याय म्हणून विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले आकाश कंदील त्यांच्या घरावर दिसणार असून, एकप्रकारे स्वदेशी वस्तूंचा चालना देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. -शिवाजीराव लंके (मुख्याध्यापक, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *