• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

भोयरे पठार येथील बाबा टकले आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

ByMirror

Jan 19, 2024

गावाच्या विकासात्मक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- गावाच्या विकासात्मक कार्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल भोयरे पठार (ता. नगर) येथील सरपंच बाबा नाथा टकले यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत झालेल्या कार्यक्रमात सरपंच टकले यांना माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतीताई गडकरी, उद्योजक बाळासाहेब शहाणे, कार्यक्रमाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा अनिताताई काळे, कवयित्री प्रतिभा खैरनार, साहेबराव बोडखे, सामाजिक कार्यकर्ते अवी साठे, विजय भालसिंग, गणेश भगत आदी उपस्थित होते.


भोयरे पठार येथील सरपंच बाबा नाथा टकले गावाच्या विकासात्मक कार्यात सातत्याने योगदान देत आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम घेऊन गावाचा विकास साधत आहे. प्रलंबीत असलेले गावातील अंतर्गत रस्त्याचे प्रश्‍न त्यांनी मार्गी लावले. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असताना स्वखर्चाने ग्रामस्थांना पाण्याचे टँकर त्यांनी पुरवले.

बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला गावात चालना दिली. तर गावाचे रुप पालटण्यासाठी शासनाचे विविध निधी उपलब्ध होण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरु असून, गावाच्या विकासासाठी त्यांची सुरु असलेली धडपड व योगदानाची दखल घेऊन त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. आमदार निलेश लंके यांनी सरपंच टकले यांना शुभेच्छा दिल्या. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *