• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

महेश नागरी पतसंस्थेत  तज्ञ संचालकांची नेमणूक

ByMirror

Jun 5, 2025
महेश नागरी पतसंस्थेत तज्ञ संचालकांची नेमणूक

डॉ. श्रीकांत गांधी व रतिलाल गुगळे यांचा भव्य सत्कार

नगर (प्रतिनिधी)-  भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी संस्थेचे जेष्ठ संचालक डॉ. श्रीकांत गांधी आणि संस्थापक संचालक रतिलाल गुगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीनिमित्त संस्थापक चेअरमन नंदकुमार झंवर (मन्नूशेठ), व्हाईस चेअरमन शांतीलाल मुनोत आणि संचालक मारुती पवार यांच्या हस्ते त्यांचा  सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार झंवर यांनी उपस्थितांना संबोधित करताना संस्थेच्या तीन दशकामधील वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला. त्यांनी सांगितले, महेश नागरी पतसंस्था ही आज जेव्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि विश्‍वासार्ह संस्था म्हणून ओळखली जाते, ते यामागे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, संचालकांची आणि कर्मचाऱ्यांची कठोर मेहनत आहे. डॉ. गांधी व गुगळे यांची नियुक्ती संस्थेला अधिक व्यावसायिक आणि धोरणात्मक दृष्टिकोन देईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


संचालक मारुती पवार म्हणाले की, डॉ. श्रीकांत गांधी यांचा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्य, तसेच रतिलाल गुगळे यांचा सहकार क्षेत्रातील सखोल अभ्यास, संस्थेच्या भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. दोघांचं मार्गदर्शन मिळणं म्हणजे संस्थेसाठी नवी ऊर्जा आणि नवी दिशा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सत्काराला उत्तर देताना डॉ. श्रीकांत गांधी यांनी संस्थेने दिलेली जबाबदारी मी पूर्ण विश्‍वासाने आणि प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. सभासदांच्या हितासाठी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी कार्यरत राहणे, हे सर्वोच्च ध्येय असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रतिलाल गुगळे यांनीही


माझं सहकार चळवळीतील कार्य, संस्था उभारणीच्या काळातील अनुभव आणि या क्षेत्रातील कौशल्य वापरून मी संस्थेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *