• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

नगरकल्याण महामार्गावरील काँक्रीटीकरणाच्या कामात अवैध खनिज वाहतूकीचा आरोप

ByMirror

Nov 18, 2025
नगरकल्याण महामार्गावरील काँक्रीटीकरणाच्या कामात अवैध खनिज वाहतूकीचा आरोप

ईटीपी बसविण्याच्या नियमांचे उल्लंघन, महसूल अधिकाऱ्यांकडून तपासणीला झालेली टाळाटाळ

विभागीय आयुक्त कार्यालया समोर अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात नगरकल्याण महामार्ग क्र. 61 वरील सुरु असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामात ठेकेदार कंपनीकडून मोठ्या प्रमाणात नियमबाह्य कृत्ये झाल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने केला आहे. अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक, ईटीपी बसविण्याच्या नियमांचे उल्लंघन, तसेच महसूल अधिकाऱ्यांकडून तपासणीला झालेली टाळाटाळ याबाबत समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. या सर्व प्रकरणात 8 दिवसांत कारवाई न झाल्यास 24 नोव्हेंबर पासून विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे बेमुदत उपोषणास करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.


काळेवाडी ते अहिल्यानगर या मार्गावर काँक्रीटीकरणासाठी ठेका घेतलेल्या कंपनीने टीएमसी प्लांट अनेक दिवसांपासून सुरू केला आहे. समितीच्या निवेदनानुसार, प्लॅन एस्टिमेटमध्ये नसतानाही जामगाव गट क्र. 2 मधून दगडमुरुमाचे उत्खनन करून अवैध वाहतूक करण्यात आली. काही प्रमाणात रॉयल्टी भरली असली तरी संपूर्ण उत्खननाचा हिशोब देण्यात आलेला नाही. महसूल अधिनियम 1966 नुसार खनिज वाहतूक परवाना, पासबुक, नोंदी, वाहनांची तपासणी इत्यादी प्रक्रिया बंधनकारक असूनही उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खणकर्म अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांनी तपासणी केली नसल्याचा आरोप आहे.


समितीने केलेल्या आरोपांनुसार खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे वाहतूक परवाना (पास) नाही, वाहन क्रमांक परवान्यात नोंदविण्यात आलेला नाही, परवान्यात वेळ, तारीख, अंक व अक्षर स्वरूपात माहिती देणे कायदेशीरदृष्ट्या आवश्‍यक असतानाही कंपनीने नियम पाळले नाहीत. खाणीचे ठिकाण मुख्य रस्त्यापासून 500 मीटर अंतरावर असणे बंधनकारक, परंतु कंपनीने त्याचे पालन केले नाही. खनिज वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर ईटीपी (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट पास) अनिवार्य, मात्र एकाही वाहनावर ते बसवण्यात आलेले नसल्याचा आरोप समितीने केला.
अवैध वाहतूक महसूल विभागाच्या आशिर्वादाने खुलेआम सुरू आहे. “नियमांचा भंग करूनही कोणत्याही अधिकाऱ्याने तपासणी करून अहवाल पाठवलेला नाही; ही गंभीर बाब असल्याचे म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *