• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांचे तालिम संघाच्या वतीने स्वागत

ByMirror

Aug 25, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- नव्याने रुजू झालेले क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांचा अहमदनगर जिल्हा तालिम संघ व नगर तालुका तालिम कुस्तीगीर संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.


जिल्हा तालिम संघाचे खजिनदार तथा नगर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी वीर यांचा सत्कार केला. यावेळी राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे यांनी वीर यांच्याशी कुस्ती खेळ संबंधी चर्चा करुन अहमदनगर जिल्ह्यात कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी व विविध स्पर्धा भरविण्याचे स्पष्ट केले. क्रीडा अधिकारी वीर यांनी कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *