भिंगारच्या जॉगींग पार्कमध्ये योगाचे शेड उभारण्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार -आ. संग्राम जगताप
आरोग्य व पर्यावरण चळवळीसाठी अधिक भरीव योगदान देण्याचे जगताप यांचे आश्वासन
नगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपची चळवळ दिशादर्शक आहे. विधानसभा निवडणुकीत या ग्रुपच्या प्रत्येक सदस्यांनी शहराच्या विकासात्मक दृष्टीकोनाने पाठिंबा देऊन मताधिक्याने निवडून आणण्यासाठी योगदान दिले. पुन्हा मिळालेल्या संधी विकासात्मक कामांना गती दिली जाणार आहे. भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये योगासाठी शेड उभारण्याच्या कामाचे लवकरच प्रारंभ करण्याचे आश्वासन देऊन आरोग्य व पर्यावरण चळवळीसाठी यापेक्षा अधिक भरीव योगदान देण्याचे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी दिले.

नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप मताधिक्याने निवडून आल्याबद्दल हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. जगताप बोलत होते. याप्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, जहीर सय्यद, सचिन चोपडा, सुमेश केदारे, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, अभिजीत सपकाळ, दिलीप गुगळे, उद्योजक लॉरेन्स स्वामी, जालिंदर बेल्हेकर, प्रांजली सपकाळ, शोभाताई मुंढे, गायत्री मुंढे, आरती बोऱ्हाडे, महेश गोंडाळ, रतनशेठ मेहेत्रे, दीपक धाडगे, संतोष हजारे, सचिन पेंढुरकर, विकास भिंगारदिवे, जैद सय्यद, श्यामराव वागस्कर, सरदारसिंग परदेशी, जयकुमार मुनोत, रमेश कोठारी, भीमराव फुंदे, नितीन आव्हाड, शंकरराव पंगुडवाले, दीपक मेहतानी, किरण फुलारी, शिरीष पोटे, किशोर भगवाने, अनंत सदलापूरकर, देवेंद्र जाधव, बबलू नंदे, अशोक भगवाने, दशरथ मुंडे, योगेश चौधरी आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपमध्ये सर्व समाजाचे व पक्षाचे विविध क्षेत्रातील सदस्य विविध भागातून जोडले गेलेले आहे. निपक्षपणे ग्रुपचे कार्य सुरु असले, तरी विकासात्मक व्हिजनला पाठिंबा देऊन चांगल्या भविष्याच्या दृष्टीकोनाने हरदिनच्या सदस्यांनी आ. जगताप यांना जाहीर पाठिंबा दिला होता. जगताप यांनी राजकारण व समाजकारणात कार्य करताना खेळ, क्रीडा मैदान यांना चालना देण्याचे कार्य केल्याने सर्व सदस्य त्यांच्या पाठिशी एकवटले होते. तर त्यांना निवडून आणण्यासाठी खारीचा वाटा उचलला. त्यांच्या माध्यमातून भिंगार शहर व जॉगींग पार्कचे अनेक प्रश्न सोडविण्यात आलेली आहे. त्यांना पुन्हा आमदार होण्याची संधी मिळाल्याने त्यांच्याकडून सदस्यांना मोठ्या अपेक्षा असल्याची भावना व्यक्त केली.