• Wed. Jun 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

रेसिडेन्शिअल महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दीपक जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

ByMirror

Jun 10, 2026
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

शिर्डी येथे बी दि चेंज फाउंडेशनच्या वतीने सन्मान


शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बी दि चेंज फाउंडेशनच्या वतीने अहिल्यानगर येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे रेसिडेन्शिअल कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दिपक नाना जाधव यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “आदर्श शिक्षक पुरस्कार 2026” ने गौरविण्यात आले.


शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील गुणवंत, कर्तव्यनिष्ठ व समाजाभिमुख शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला. यामध्ये प्रा. डॉ. जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सुभेदार मेजर दिनकर पवार, माजी सैनिक अधिकारी अरुण भंडारे, अभिनेत्री निवेदिता पगार, बाबासाहेब कापे, प्रकाश कोळपे तसेच अमृत रोहोम आदी उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे, सचिव रचना ढोकचौळे व विश्‍वस्त अभिषेक तुपे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.


प्रा. डॉ. जाधव यांनी भूगोल, राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र या चार विषयात पदवीत्तर पदवी संपादन केली आहे. तसेच ते राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट), व राज्य पात्रता परीक्षा (सेट) या दोन्ही परीक्षा यापूर्वीच उत्तीर्ण असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाने भूगोल विषयात त्यांना पी .एचडी ही पदवी प्रदान केली आहे.


डॉ. जाधव हे देहरे ता. जि. अहिल्यानगर येथील ग्रामपंचायतचे दोन वेळा सदस्य व एकदा उपसरपंच राहिले आहेत. त्यांनी ग्रामपंचायतीच्या काळात अनेक वेळ उपोषण तसेच रस्ता रोको सारख्या अंदोलनातून गावाचे व समाजाचे अनेक प्रश्‍न मार्गी लावलेले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठ विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रा.ह. दरे, उपाध्यक्ष सिताराम खिलारी, सचिव ॲड. विश्‍वासराव आठरे पाटील, सहसचिव मुकेश दादा मुळे, खजिनदार ॲड. दिपलक्ष्मी म्हसे, सदस्य दिपक दरे, प्राचार्य विजय जाधव, उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर, दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. काशिनाथ सुलाखे पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच शिक्षण क्षेत्रासह सामाजिक, राजकीय व विविध स्तरांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *