• Tue. Jun 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

राज्यव्यापी संपाला भाकप व आयटकचा सक्रीय पाठिंबा -अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर

ByMirror

Mar 14, 2023

जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने मंगळवार (दि.14 मार्च) पासून सुरु झालेल्या बेमुदत संपाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती भाकपचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे, जिल्हा सचिव अ‍ॅड. बन्सी सातपुते, भाकपचे जिल्हा सहसचिव अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी दिली.
भाकपचे जिल्हा सहसचिव व आयटकचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या समन्वय समिती व जिल्हा परिषद येथे झालेल्या कर्मचार्‍यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवून पक्षाचा व संघटनेचा पाठिंबा दिला.


माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये जुनी पेन्शन 2005 च्या दरम्यान बंद झाली होती. त्यानंतर ही पेन्शन सरकारी कर्मचार्‍यांना मिळणे बंद झाली. राज्य सरकार कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने ही पेन्शन योजना लागू करावी म्हणून अनेक निवेदन दिले, अनेक मोर्चे काढले. परंतु ही जुनी पेन्शन योजना सुरू झाली नाही. राज्य सरकारने यापूर्वी जुनी पेन्शन बाबत विचार करण्याचे आश्‍वासन दिले होते. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, परंतु अनेक सरकार येऊन गेले तरीदेखील जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही. देशातील चार राज्यांमध्ये सदर पेन्शन योजना लागू झालेली आहे. राज्य सरकारने पुढाकार घेऊन जुनी पेन्शनची मागणी मान्य करावी व कर्मचारी आणि शिक्षकांचा संप मिटविण्याची भूमिका भाकप व आयटकच्या वतीने मांडण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *