• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

विविध प्रकारचे देयके मिळण्यासाठी शिक्षकांची मागणी

ByMirror

Jan 10, 2023

माध्यमिक शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षक यांची भेट घेऊन चर्चा

सर्व प्रलंबित बिल मार्च अखेर पर्यंत क्लिअर करण्याचे शिष्टमंडळास आश्‍वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बांधवांचे विविध प्रकारचे देयके मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस व वेतन पथक अधीक्षक स्वाती हवेले यांची भेट घेऊन निवेदन दिले.

तर सदर प्रश्‍नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, अर्जुन लोंढे, सतीश वाणी, वीरेश नवगिरे, गोवर्धन पांडुळे, विलास कदम, मुख्याध्यापक विश्‍वनाथ शेलार आदी उपस्थित होते.


जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतरांचे थकीत पुरवणी बिले, वैद्यकीय बिले, सातवा वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे डीए फरक मिळण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर प्रलंबीत असलेल्या विविध प्रस्तावांना नियमानुसार मंजूरी देण्याचे स्पष्ट करण्यात आले.


माध्यमिक शिक्षणाधिकारी कडूस व वेतन पथक अधीक्षक हवेले यांनी शिक्षक, शिक्षकेतरांचे सर्व प्रलंबित बिले मार्च अखेर पर्यंत क्लिअर करण्याचे शिष्टमंडळास आश्‍वासन दिले. तर कडूस यांनी निवड श्रेणीचे प्रस्ताव नियमानुसार मंजूर करण्यात आले आहे. ज्या प्रस्तावांच्या त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या त्रुटी पूर्ण झाल्यानंतर त्यांना मान्यता देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तर मयत कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी सातवा वेतन आयोगाचा हप्ता मिळण्यासाठी जून 2022 नंतर ज्यांनी बिल सादर केले नाही, त्यांना सदरचे बिल पे युनिट कार्यालयात सादर करण्याचे त्यांनी आवाहन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *