• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

स्वायत्त दर्जा मिळालेल्या त्या महाविद्यालयाच्या पारनेर शाखेकडून माहिती देण्यास टाळाटाळ

ByMirror

Jan 10, 2023

चौकशी करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी

अनियमितता असल्याने माहिती दडवली जात असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या व स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळालेल्या त्या महाविद्यालयाच्या पारनेर शाखेकडून बांधकाम खात्याची, यु.सी.जी. मॅनेजमेंट कार्यालयातील अ‍ॅडमिशनची माहिती दडवली जात असल्याने यासंबंधी माहितीची चौकशी मुख्य लेखापाल (मुंबई) विभागाकडून करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी केली आहे.

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य लेखापाल विभागाला पाठवून याप्रकरणी कारवाई न झाल्यास मुख्य लेखापाल विभागा यांच्या कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


7 सप्टेंबर 2010 व 13 ऑक्टोंबर 2022 रोजी बांधकाम खात्याची, यु.सी.जी. व मॅनेजमेंट कार्यालयातील अ‍ॅडमिशनची माहिती पारनेरच्या त्या महाविद्यालयाकडून मागविण्यात आली होती. परंतु माहितीमध्ये अनियमितता असल्याने जाणीवपूर्वक महाविद्यालयीन प्रशासन माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. त्या महाविद्यालयाच्या कारभार जनतेसमोर उघड होऊ नये, या भीतीपोटी माहिती देण्यास दिरंगाई व टाळाटाळ केली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


मागवलेली माहिती ही जनतेच्या हिताची असून, संस्थेचा चाललेला गैरकारभार जनतेपुढे येणार आहे. संपूर्ण माहितीचे ऑडिट करून मुख्य लेखापाल विभागाकडून चौकशी व्हावी, जबाबदार असणार्‍या दोषींवर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *