• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

ByMirror

Dec 9, 2022

विविध सामाजिक कार्याचा गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल भिमराव सकट यांना भारतीय लहुजी सेनेच्या वतीने राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याचा पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला.

सुनिल सकट


लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228 व्या जयंती उत्सवानिमित्त निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणार्‍यांना श्रीरामपूर येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी इंजि. के.के. आव्हाड, महंत नारायण गिरी महाराज, भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय प्रमुख बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय उपाध्यक्ष रंजीत बरहाळेकर, राष्ट्रीय सचिव हानिफ पठाण, अ‍ॅड. रमेश कोळेकर, सुरेशदादा अडागळे, रज्जाकभाई शेख, अमर सय्यद, असलम बिनसाद, शेख बरकत अली, उद्योजक हाजी लतीफ सय्यद आदी उपस्थित होते.


सुनिल सकट शाहु, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजीक विचारमंचाचे प्रदेश कार्याध्यक्ष असून, त्यांचे विविध क्षेत्रात सामाजिक कार्य सुरु आहे. वंचित, दीन-दुबळ्यांना आधार देऊन ते दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवित असतात. समाजातील विविध प्रलंबीत प्रश्‍नांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांनी राबविलेले स्वच्छता मोहीम, रक्तदान, वृक्षरोपण, मोफत शालेय साहित्याचे वाटप, कोरोना महामारीतील योगदान आदी सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

त्यांना यापूर्वी सामाजिक कार्याबद्दल तब्बल 32 पुरस्कार मिळालेले आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *