• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

स्मृतीदिनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर मंडप व बसण्याची व्यवस्था करावी

ByMirror

Nov 25, 2022

राष्ट्रवादीचे मनपा उपायुक्तांना निवेदन

निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणार्‍यांचा होणार गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास्थळी सोमवारी (दि.28 नोव्हेंबर) साजरी केली जाणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वतीने निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणार्‍यांचा स्मृतीदिनानिमित्त गौरव केला जाणार आहे. या ठिकाणी समाजबांधवांच्या सोयीसाठी मंडप व बसण्याची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून करुन देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनपाचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.


राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने उपायुक्त पठारे यांची भेट घेऊन सदर मागणीबाबत चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीवे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, ओबीसी सेलचे अमित खामकर, सारंग पंधाडे, प्रदीप जाधव, राहुल फुलसौंदर, आदीनाथ जाधव, भरत जाधव आदींसह युवक उपस्थित होते.


महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने सर्व समाज घटकातील अनुयायी उपस्थित राहतात. शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन, सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. या दिवशी या परिसराची संपूर्ण स्वच्छता, परिसरात मंडप व बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करुन देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *