• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

गांधी मैदानातील मार्कंडेय विद्यालयात रमेश सब्बन यांना श्रध्दांजली

ByMirror

Nov 12, 2022

सब्बन यांचे सामाजिक कार्य व जुन्या आठवणींना उजाळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा पद्मशाली समाजातील ज्येष्ठ सामाजसेवक रमेश नरसय्या सब्बन यांना गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयात श्रध्दांजली वाहण्यात आली.


शुक्रवारी (11 नोव्हेंबर) रमेश सब्बन यांचे वयाच्या 95 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. ते कृषि विभागातील वर्ग -1 चे माजी अधिकारी होते. त्यांनी विडी कामगारांच्या मुलांसह इतर सर्वसामान्य घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळात कार्यरत राहून योगदान दिले. या कार्यक्रमात त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.


यावेळी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सर्व संचालक, मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, प्राचार्य बत्तिन पोट्यन्ना प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व श्रमिकनगर मार्कंडेय विद्यालयातील शिक्षक व इतर शिक्षकेतर वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *