• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

म्हाडाने प्रेमदान चौकातील 40 व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीत दिव्यांगांना डावलले

ByMirror

Nov 11, 2022

5 टक्के आरक्षणावर गडांतर आनल्याचा प्रहार अपंग क्रांती संस्थेचा आरोप

दिव्यांगांचे आरक्षण जाहीर करुन निविदेची जाहिरात पुन्हा प्रकाशित करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रेमदान चौकातील नाशिक गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाकडून बांधण्यात आलेल्या 40 व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीत दिव्यांगांना डावलून त्यांच्या हक्काचे 5 टक्के आरक्षणावर गडांतर आनल्याचा आरोप प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. या व्यावसायिक गाळे विक्रीत 5 टक्के दिव्यांगांचा समावेश होण्यासाठी निविदेची जाहिरात पुन्हा प्रकाशित करण्याची मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे यांनी नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ मुख्य अधिकारी यांना पाठविले आहे.


नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ नाशिक अंतर्गत येणार्‍या अहमदनगर शहरातील प्रेमदान चौक परिसरात म्हाडाने 8 कोटी रुपये खर्च करुन 40 व्यावसायिक गाळे उभारले आहे. या गाळ्यांची एक रक्कम पद्धतीने खरेदी करण्यासाठी पात्र अर्जदारांकडून सीलबंद निविदा मागवणारी जाहिरात नुकतीच प्रकाशित झालेली आहे. सदरील जाहिरातीत बिल्डिंगमध्ये सर्वसाधारण जनता- 32, अनुसूचित- 3, अनुसूचित जमाती- 3, भटक्या जमाती -1 एक आणि विमुक्त जाती-1 असे व्यापारी गाळ्यांचे आरक्षण दर्शविलेले आहे.


अपंग (दिव्यांग) व्यक्ती अधिकार अधिनियम 2016, प्रकरण 6 मधील कलम 37 (क) नुसार गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांनी अवलंबलेल्या योजनांमध्ये 5 टक्के आरक्षण पात्र दिव्यांग व्यक्तींना देणे बंधनकारक असताना सुद्धा आरक्षण न दाखवता या कलमाचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. विशेष योजना व विकास कार्यक्रमांतर्गत शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी भेदभाव न करता दिव्यांगांना समान संधी देणे गरजेचे असताना, त्यांचे आरक्षण न दाखवल्याने त्यांना हक्काच्या संधी पासून दूर ठेवण्यात आले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

म्हाडाच्या इतर प्रकल्पात दिव्यांगांना 5 टक्के आरक्षण ठेवले जात असताना, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ अंतर्गत येणार्‍या अहमदनगर शहरातील सावेडी प्रेमदान चौक येथील व्यापारी गाळ्यांच्या विक्रीत त्यांना डावलल्याचे समोर येत आहे. सदरील जाहिरात मागे घेऊन दिव्यांगांचे आरक्षण नमूद करून नव्याने जाहिरात प्रकाशित करण्यात यावी व निविदा भरण्यास योग्य ती मुदत वाढ मिळण्याची मागणी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा दिव्यांगांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *