जळगाव येथे झाला सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सुप्रसिद्ध कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या व मुक्त पत्रकार सरोज आल्हाट यांना जळगाव येथील आदिलशहा फारुकी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय मॅडम भिकाजी कामा आदर्श महिला उत्कृष्ट लेखिका सन्मान 2026 नुकताच प्रदान करण्यात आला.
अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यास जळगावचे जिल्हाधिकारी रोहन बापूराव घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी सौ. वैशाली चव्हाण, आमदार राजू मामा भोळे, फारुक शहा नौमानी, डॉ.जावेद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
सरोज आल्हाट या केवळ कवियत्री म्हणूनच नव्हे तर सामाजिक प्रश्नांवर लेखन आणि सक्रिय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांचे मराठी तसेच इंग्रजी काव्यसंग्रह प्रकाशित असून 30 वर्षांपेक्षा अधिक काळ त्या लेखन व सामाजिक कार्याच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. यापूर्वीही त्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरीय अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. या सन्मानाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
