कॉम्रेड अजित झगडे यांची विभागीय सचिवपदी पुन्हा बिनविरोध फेरनिवड
संघटनात्मक कार्याची पावती; उमाकांत वालगुडे विभागीय अध्यक्ष, तर अशोक दळवे खजिनदारपदी फेरनिवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया RMS & MMS एम्प्लॉईज युनियन ग्रुप ‘C’, RMS ‘B’ डिव्हिजन, पुणे या संघटनेचे 46 वे द्विवार्षिक अधिवेशन नुकतेच अहिल्यानगर, केडगाव येथील हॉटेल रंगोली येथे उत्साहपूर्ण व संघटनात्मक वातावरणात पार पडले. या अधिवेशनात आगामी कार्यकाळासाठी विभागीय सचिवपदी कॉम्रेड अजित झगडे यांची पुन्हा एकदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वावर, संघटनात्मक कार्यावर आणि कर्मचारी हितासाठीच्या संघर्षशील भूमिकेवर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.
कॉम्रेड अजित झगडे हे गेल्या अनेक वर्षांपासून पोस्टल कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. मागील दोन वर्षांपासून विभागीय सचिव म्हणून त्यांनी प्रभावीपणे जबाबदारी सांभाळली आहे. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर व लातूर या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. अभ्यासू, संयमी, निर्भीड आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विशेषतः NPS/UPS रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करणे, RMS व MMS विभागाचे संरक्षण, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवा विषयक समस्या, कार्यालयीन पायाभूत सुविधांचा अभाव, मनुष्यबळाची कमतरता तसेच कर्मचारी हिताच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी संघटनात्मक पातळीवर प्रभावी भूमिका बजावली आहे. केवळ मागण्या मांडण्यापुरते मर्यादित न राहता प्रशासनाशी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावण्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत सभासदांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विभागीय सचिवपदाची जबाबदारी सोपविली आहे.
या अधिवेशनात विभागीय अध्यक्षपदी कॉम्रेड उमाकांत वालगुडे, विभागीय सचिवपदी कॉम्रेड अजित झगडे आणि विभागीय खजिनदारपदी कॉम्रेड अशोक दळवे यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच यावेळी विभागीय कार्यकारिणीची निवड देखील करण्यात आली. या अधिवेशनाला संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड अरविंद शिवतरे, सर्कल खजिनदार कॉम्रेड रवींद्र काशीद, फेडरल कौन्सिलर कॉम्रेड राजू मगर, असिस्टंट जनरल सेक्रेटरी कॉम्रेड विठ्ठल आबनावे आणि असिस्टंट सर्कल सेक्रेटरी कॉम्रेड राहुल खेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी संघटनेची सद्यस्थिती, कर्मचारी हिताचे प्रश्न, संघटनात्मक बळकटीकरण आणि आगामी काळातील आंदोलनात्मक कार्यक्रमांबाबत मार्गदर्शन केले.
अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अहिल्यानगर शाखेचे सचिव कॉम्रेड सचिन गाडेकर, अध्यक्ष कॉम्रेड लक्ष्मीकांत दरबस्तवार, उपाध्यक्ष कॉम्रेड बाबासाहेब बोरुडे, विभागीय उपसचिव कॉम्रेड व्ही. एफ. पारधी, सोशल मीडिया प्रमुख कॉम्रेड परशुराम वाघमोडे, कॉम्रेड सूर्यवंशी तसेच महिला समितीच्या मोनल बडवे, स्मिता फुलकर, गीते मॅडम आणि मगर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे अधिवेशन उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले.
कॉम्रेड अजित झगडे यांची विभागीय सचिवपदी झालेली फेरनिवड ही केवळ एका पदावरील निवड नसून, त्यांच्या आजवरच्या निष्ठावान संघटनात्मक कार्याला आणि कर्मचारी हितासाठी केलेल्या संघर्षाला मिळालेली पावती आहे. नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली RMS ‘B’ डिव्हिजनची संघटना अधिक सक्षम, एकजूट आणि संघर्षशील करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, संघटनेचा विस्तार करणे आणि सभासदांच्या हक्कांसाठी अधिक जोमाने लढा देणे यासाठी नवनिर्वाचित कार्यकारिणी कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले. कॉम्रेड अजित झगडे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर संपूर्ण विभागातून अभिनंदन होत आहे.
–
विभागीय कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:-
विभागीय अध्यक्ष- उमाकांत वालगुडे,उपाध्यक्ष- महादेव निंबाळ, बाबासाहेब बोरुडे
विभागीय सचिव- अजित झगडे
विभागीय उपसचिव- राजेंद्र चव्हाण, निसार तडवी, संतोष गायकवाड, श्रीकांत पाटील, वसंत पारधी, रियाज नदाफ, प्रवीण खरवले,
संघटक सचिव- तुषार टाक,
खजिनदार- अशोक दळवे
उपखजिनदार- सुनील उंडे
हिशोब तपासनीस- सोमनाथ म्हेत्रे

