• Sun. Oct 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात नवरात्रोत्सवानिमित्त वृक्षारोपण

ByMirror

Oct 18, 2026
सार्वजनिक वाचनालयाचा पुढाकार

पर्यावरण संवर्धनाचा संदेश; डोंगरे संस्थेसह नवनाथ युवा मंडळ व ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचा पुढाकार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने गावातील रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले. केवळ वृक्षलागवड करून न थांबता लावलेल्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही संस्थेने स्वीकारली आहे.
जिल्हा परिषदेच्या ‘नवरात्री स्वच्छता उत्सव’ या उपक्रमांतर्गत संस्थेच्या वतीने गावात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती केली जात आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे आणि पर्यावरणपूरक संदेश देणारे उपक्रम राबविण्यावर संस्थेच्या वतीने उपक्रम राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने वृक्षारोपण करण्यात आले


या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी वृक्षारोपण केले. वृक्षलागवडीमुळे परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून, भविष्यात या झाडांमुळे नागरिकांना सावली मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे. मात्र, वृक्षारोपणासोबतच झाडांना नियमित पाणी देणे, त्यांचे संरक्षण करणे आणि त्यांची योग्य वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याने संस्थेच्या वतीने वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही स्वीकारण्यात आली.


पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वाढते तापमान, पर्यावरणातील असमतोल आणि कमी होत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. केवळ एखाद्या कार्यक्रमापुरते वृक्षारोपण मर्यादित न ठेवता लावलेली झाडे जगविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. हाच विचार पुढे ठेवून निमगाव वाघा येथे हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे पै. नाना डोंगरे यांनी सांगितले.
वृक्षरोपण करण्यासाठी मयूर काळे, कार्तिक डोंगरे, वरद ठाणगे यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *