• Sun. Oct 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

नवरात्रोत्सवात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भाविकांना खिचडी व फळांचे वाटप

ByMirror

Oct 18, 2026
दुष्काळ हटून पाऊस पडावा यासाठी देवीचरणी प्रार्थना

भिंगारच्या तुळजामाता मंदिर परिसरात वृक्षारोपण अन्‌ स्वच्छता अभियान


दुष्काळ हटून पाऊस पडावा यासाठी देवीचरणी प्रार्थना


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भिंगार येथील विजयलाइन चौकातील अंबिका तरुण मंडळाच्या तुळजामाता मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडी व फळांचे वाटप करण्यात आले. तसेच मंदिर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीतून नागरिकांना दिलासा मिळावा आणि सर्वत्र समाधानकारक पाऊस पडावा, यासाठी तुळजामाता चरणी प्रार्थनाही करण्यात आली.


कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. रतन मेहेत्रे, ताराचंद ठोकळ आणि अशोक पराते यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. वाढते तापमान, पावसाचे बदलते प्रमाण, पाण्याची टंचाई आणि दुष्काळाचे संकट लक्षात घेता वृक्षारोपण व संवर्धनाचे आणि निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारण्याचे स्पष्ट करण्यात आले.


भाविकांना खिचडी व फळांचे वाटप करताना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी थोरात, अजय गव्हाणे, हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, सरदारसिंग परदेशी, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, प्रांजली सपकाळ, जोगिंदरसिंग, ईशान शेख, जैद सय्यद, प्रशांत चोपडा अश्‍विनी गोरखे, लताताई गुरव, माधवी माळगे, संगीता सपकाळ, अनिता शेलार, कीर्ती ठाकूर, महिमा माळगे, अंजना भुजबळ, सुनिता गडाख, दिलीप ठोकळ, रमेश वराडे, ईवान सपकाळ, विलास आहेर, मंदिराचे पुजारी सुनील देवा गुरव, नंदू भंडारे, राहुल पानसरे, सोनू भुजबळ, संजय येलुलकर, सरोवर खान, अश्‍विन ठाकूर आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी थोरात यांनी धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अन्नदान, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक स्वच्छता या गोष्टी समाजाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असून, त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देणे आवश्‍यक असल्याची भावना व्यक्त केली.
संजय सपकाळ म्हणाले की, धार्मिक उत्सव हे केवळ पूजा-अर्चा आणि दर्शनापुरते मर्यादित न राहता त्यातून समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि माणुसकीची जपणूक झाली पाहिजे. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांना खिचडी व फळांचे वाटप, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान असे उपक्रम राबवून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने सामाजिक कार्यात सहभाग घेतल्यास समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन चोपडा म्हणाले की, “पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. वृक्षारोपण, वृक्षांचे संगोपन, पाण्याची बचत आणि परिसराची स्वच्छता या गोष्टी प्रत्येकाने आपल्या जीवनाचा भाग बनविल्या पाहिजेत. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात तुळजामाता मंदिरात सामाजिक उपक्रम राबविण्याचा आनंद आहे. सध्या पाण्याची टंचाई आणि दुष्काळाचे संकट दूर होऊन सर्वत्र चांगला पाऊस पडावा, शेतकरी सुखी व्हावेत आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी आम्ही देवीचरणी प्रार्थना केली असल्याची माहिती त्यांनी दिली.


या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सखाराम अळकुटे, अशोक लोंढे, ज्ञानेश्‍वर अनावडे, सुधीर कपाळे, दीपक धाडगे, मनोहर दरवडे, अविनाश जाधव, शेषराव पालवे, सुभाष पेंढुरकर, दीपक मेहतानी, अभिजीत सपकाळ, रामनाथ गर्जे, उमाशंकर पंडित, अविनाश पोतदार, शिरीषराव पोटे, अनिल सोळसे, संतोष हजारे, दीपक घोडके, शशिकांत पवार, कुमार धतुरे, दिलीप गुगळे, दत्तात्रय लाहुंडे, राजेश तनपुरे, विठ्ठल राहिंज आणि दशरथ मुंडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. धार्मिक स्थळांसह परिसराची स्वच्छता राखणे ही प्रत्येक भाविकाचीही जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *