• Sun. Oct 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

एमआयडीसीच्या रेणुका माता मंदिरात युवा सेनेच्या वतीने भाविकांना खिचडी व फळांचे वाटप

ByMirror

Oct 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणे ही समाधानाची बाब -योगेश गलांडे

दोन हजार भाविकांनी घेतला लाभ; पाऊस पडून बळीराजा सुखी होण्यासाठी देवी चरणी साकडे


नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणे ही समाधानाची बाब -योगेश गलांडे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानात नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांना युवा सेनेच्या वतीने खिचडी व फळांचे वाटप करण्यात आले. तर राज्यातील दुष्काळ हटावा याकरिता पाऊसासाठी रेणुका माता चरणी साकडे घालण्यात आले. पाऊस पडून बळीराजाला सुख-सुमृध्दी येण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.


युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांच्या पुढाकारातून खिचडी व फळ वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा तब्बल दोन हजार भाविकांनी लाभ घेतला. युवा सेनेने धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने भाविकांची सेवा करण्याच्या उद्देशाने राबविला. नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुका माता देवस्थानात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. सातव्या माळेनिमित्त मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी असते. भाविकांना उपवासाच्या काळात खिचडी व फळांचा लाभ मिळावा, या उद्देशाने युवा सेनेच्या वतीने वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात नियोजनबद्ध पद्धतीने भाविकांना खिचडी व फळांचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमात युवा सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख संभाजी कदम, रणजीत परदेशी, विक्रम राठोड, दत्तात्रय तापकीरे, श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, शंकर शेळके, अमित बारवकर, सुनील शेवाळे, विशाल गीते, सागर गलांडे, वैष्णव गलांडे, शिव वाकळे, पवन शिरसागर, शिवराज गलांडे, गौरव पाटोळे, अमोल घुटे, स्वप्निल भरड, अजिनाथ शिरसाट, अभिजीत सांबारे, जितेंद्र तळेकर, वसीम शेख, अमोल ठोकळ, सचिन खेसे, अमोल म्हेत्रे, नामदेव झेंडे, फिरोज शेख, किसन तरटे, शरद थोरात, सोमनाथ आंधळे, रामनाथ घुगे, विष्णू घुगे, भरत दिंडे, राहुल मेहेरखाब, नितीन खेसे, अविनाश कर्डिले, संदीप मगर, तुषार शेवाळे, अशोक भगत, सागर पवार, हर्षवर्धन वाकळे, गुरु वाकळे, चैतन्य वाकळे, यश नर्सिंगपुरकर, सोमनाथ बारबोले, विक्रम नितनवरे, सुशील पवार, प्रवीण सोनवणे, वाल्मीक पाटील, सागर घोडके आणि अमोल पालवे यांच्यासह युवा सेनेचे कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले की, युवा सेनेच्या माध्यमातून नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी कामगार आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लाभ झाला. धार्मिक सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न युवा सेनेकडून केला जात आहे. सामाजिक बांधिलकी जपत अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले की, युवा सेना धर्म, सेवा आणि समाजकारण या विचारांना केंद्रस्थानी ठेवून समाजात योगदान देत आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून समाजातील विविध घटकांशी जोडले जाण्याचे काम युवा सेनेकडून केले जात आहे. एमआयडीसी परिसरात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने युवक आणि कामगार वर्ग युवा सेनेशी जोडला गेला असल्याचे स्पष्ट केले.


युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे म्हणाले की, श्री रेणुका माता देवस्थानात नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उपवासाच्या काळात खिचडी व फळांची सेवा देता यावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक सण आणि उत्सव केवळ भक्तिभावाने साजरे न करता त्यांना सामाजिक उपक्रमांची जोड देऊन समाजोपयोगी कार्य करण्याचा युवा सेनेचा प्रयत्न आहे. भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणे ही समाधानाची बाब असून, यापुढेही युवा सेनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *