राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाच्या नगर तालुकाध्यक्षपदी भरत साहेबराव बोडखे यांची नियुक्ती झाल्याबद्दल निमगाव वाघा (ता. नगर) येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी बोडखे यांचा सत्कार केला. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाने भरत साहेबराव बोडखे यांच्यावर नगर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याने त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर निमगाव वाघा येथे आयोजित सत्कारप्रसंगी पै. नाना डोंगरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी उपस्थितांनी बोडखे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नगर तालुक्यात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक बळकट करणे, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटनात्मक पातळीवर काम करण्याची जबाबदारी तालुकाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर राहणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे निमगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कारप्रसंगी विजय जाधव, राहुल कदम, प्रमोद जाधव, भाऊसाहेब जाधव, शरद जाधव, सचिन जाधव, मारुती काळे, तानाजी काळे, बंटी जाधव, मयूर काळे, साहेबराव बोडखे, अनिल डोंगरे, विजय गायकवाड, नवनाथ हारदे, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.

