पाथर्डीचे तहासिलदार उद्धव नाईक यांच्या दालनात शरद पवळे यांची शेतकऱ्यांसमवेत बैठक संपन्न
पाथर्डी तहसीलवर शिवपाणंद जनजागरण यात्रेद्वारे प्रलंबित प्रकरणांसाठी
‘मिशन झिरो पेंडन्सी’ अभियान संपन्न
पाथर्डी (प्रतिनिधी)- तालुक्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले शिवपाणंद शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने ‘मिशन झिरो पेंडन्सी’ अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन त्यांना गती देण्यासाठी फस्ट इन फस्ट आऊटचा तालुकास्तरीय कृती आराखडा तयार करण्यासाठी पाथर्डी तहसील कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाथर्डी तालुका शिवपाणंद शेतरस्ते कृती समितीच्या पुढाकाराने संबंधित विभागांसोबत प्रलंबित शेरस्त्यांच्या प्रश्नांवर महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणा देत पाथर्डी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी तसिलदार उद्धव नाईक यांनी संबधित विभागांची तातडीची बैठक बोलावली. शरद पवळे यांनी तहसिलदारांकडे असणाऱ्या शेतरस्त्यांच्या प्रलंबित प्रकरणांची यादी मागवली यामध्ये अनेक जूनी प्रकरणे प्रलंबित होती.
राज्यसरकारने शिव पाणंद चळवळीची आंदोलनाची मागणीनुसार दखल घेत राज्यात महत्वपूर्ण शासननिर्णय काढण्यात आले, परंतु प्रत्यक्ष मोजक्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या भागात कामे होत असुन समांतर पारदर्शक कामे होत नाही. जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना अधिकारी वेठीस धरत आहे. यामुळे महाराजस्व अभियांनाचा फार्स ठरत आहे. यामुळे सरकार व शेतकरी यांची फसवणूक अधिकारी करत असुन फस्ट इन फस्ट आऊटप्रमाणे मिशन झिरो पेण्डन्सी अभियान राबवावे, नकाशावरच्या रस्त्यांना शाश्वत हद्दीखुणा घ्याव्यात, वहिवाटीच्या रस्त्यांच्या रुंदी नकाशावर घ्याव्यात, रस्त्यांच्या इतर अधिकारात नोंदी घ्याव्यात व प्रशासकीय न्यायालयीन आदेश निघालेल्या शेतरस्त्यांना प्राधान्याने मजबुती करणासाठी घ्यावे या विषयावर पाथर्डी तहसिलवर महाचर्चा संपन्न झाली.
यावेळी तहसिलदारांनी तातडीच्या लोकआदात घेवून मिशन झिरो पेण्डन्सीसाठी फस्ट इन फस्ट आउट प्रमाणे कार्यवाहिचे आश्वासन दिले. तदनंतर कार्यालयात कोणी पैसे मागितले तर आमची आंदोलनाची दिशा बदलू असा इशारा महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी दिला. यावेळी चळवळीचे जेष्ठ नेते पोपट शेळके, रमेश कचरे, विठ्ठल निर्मळ यांनी आभार मानले. नाथाभाऊ शिंदे, रविंद्र खुडे, बाळासाहेब थोरात, अंबादास आव्हाड, अशोक कचरे, विकास जाधव, सोमनाथ तोडमल, आशा वाघ, सविता मरकड, शिराज पठाण आदिंसह चळवळीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

