• Wed. Jul 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

लोकमाता अहिल्यादेवी होळकर समाजभूषण पुरस्काराने सुदाम ढेमरे सन्मानित

ByMirror

Jul 7, 2026
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यात गौरव

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यात गौरव


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यशवंत सेना, अहिल्यानगर आणि जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजीक विचार मंचाचे सुदाम साहेबराव ढेमरे यांना लोकमाता अहिल्यादेवी होळकर समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यात ढेमरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य तुळशिराम भोजने, यशवंत सेनेचे शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर, सरचिटणीस अजय जाडकर, शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रदीप ससाणे, मच्छिंद्र बिडगर, शर्मिला नलावडे, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त रेश्‍मा पुणेकर, डॉ. सुनील सकट आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सुदाम ढेमरे शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजीक विचार मंचच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व विविध प्रकारे शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने योगदान आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सदर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *