• Tue. May 5th, 2026

केडगाव स्पोर्ट्‌स ॲकॅडमीचे 7 खेळाडू अहिल्यानगर बास्केटबॉल संघात

ByMirror

May 4, 2026

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सातारा येथे होणाऱ्या सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेसाठी केडगाव स्पोर्ट्‌स अकॅडमीच्या सात खेळाडूंची अहिल्यानगर सब ज्युनिअर संघात निवड झाली आहे. मुलांमध्ये ध्रुव गुगळे, आदिराज कोतकर, कृष्णा ठुबे, क्रांतिक बढदे , शिवराज भस्मे ,मुलीमध्ये,तनिष्का बारहाते, अक्षरा कोतकर यांचा समावेश आहे.


नुकतेच सातारा येथे महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन सब ज्युनिअर स्पर्धेला प्रारंभ झाले असून, या स्पर्धेमध्ये सदर खेळाडू अहिल्यानगर संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. खेळाडूंना प्रशिक्षक छबुराव कोतकर व स्वाती बारहाते यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब कोतकर, ऊर्जा गुरुकुल शाळेच्या संचालिका कल्याणी फिरोदिया, ज्ञानसाधना गुरुकुल कलासेसचे संचालक प्रा. प्रसाद जमदाडे, डॉ. देवेश कुमार बारहाते, विक्रम लोखंडे, यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *