• Sun. Apr 19th, 2026

शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे जीवनगौरव पुरस्कार सोहळा 21 एप्रिलला

ByMirror

Apr 19, 2026

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. मेधाताई काळे यांना जीवनगौरवाने होणार सन्मान


प्रतिष्ठानची वार्षिक सभा व सन्मान सोहळ्याचे नियोजन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व. माधवराव दगडूजी मुळे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे जीवनगौरव पुरस्कार यावर्षी स्व. शिक्षण महर्षी मधुराजे मुळे तथा आबा यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त मंगळवार, दि. 21 एप्रिल रोजी प्रदान करण्यात येणार आहे. याच दिवशी प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा देखील आयोजित करण्यात आली असून, हा संयुक्त कार्यक्रम दुपारी 3.00 वाजता कायनेटिक चौक येथील यश ग्रॅण्ड हॉटेल येथे पार पडणार आहे.
यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका तथा महिला बँकेच्या संस्थापिका मा. प्रा. मेधाताई यशवंतराव काळे यांना प्रदान करण्यात येणार असून, त्यांच्या साहित्यिक आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा यावेळी गौरव केला जाणार आहे.


या सोहळ्याचे अध्यक्षस्थान लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे भूषविणार आहेत. तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणप्रेमी, साहित्यिक व समाजबांधव यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.


कार्यक्रमात पुरस्कार वितरणासोबतच प्रतिष्ठानच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेण्यात येणार असून, आगामी उपक्रमांची रूपरेषा देखील मांडण्यात येणार आहे. संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याचा आढावा घेऊन पुढील दिशा ठरविण्याच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे.


या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सर्व सभासद, हितचिंतक आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष मुकेश माधवराव मुळे, उपाध्यक्ष दत्ता पाटील नारळे, सचिव प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे तसेच खजिनदार बजरंग पाडळकर व सर्व विश्वस्त यांनी केले आहे. कार्यक्रम व वार्षिक सर्वसाधारण सभा नियोजित वेळेतच सुरू होणार असल्याने म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *