• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

महिला दिनानिमित्त भिंगारमध्ये महिला भाविकांची मोफत दंतरोग तपासणी

ByMirror

Mar 11, 2026
कुटुंबाचे आरोग्य सांभाळणाऱ्या महिलांनी स्वत:चे आरोग्य जपावे -महापौर ज्योतीताई गाडे

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम; तपेश्‍वर महादेव मंदिर परिसरात महिलांना आरोग्य मार्गदर्शन व सन्मान


कुटुंबाचे आरोग्य सांभाळणाऱ्या महिलांनी स्वत:चे आरोग्य जपावे -महापौर ज्योतीताई गाडे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील तपेश्‍वर महादेव मंदिर परिसरात महिला भाविकांसाठी मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. मोठ्या संख्येने महिला भाविकांनी या शिबिराचा लाभ घेतला.


या शिबिराचे उद्घाटन महापौर ज्योतीताई गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अतुल मडावी, इंडियन डेंटल असोसिएशन अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष डॉ. ओंकार भालसिंग, ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, सीए रवींद्र कटारिया, सचिन चोपडा, सुंदरराव पाटील, दिलीपराव ठोकळ, रतन मेहेत्रे, ह.भ.प. गोकुळ धाडगे, अशोक पराते, अतुल मडावी, दीपक धाडगे, ईवान सपकाळ, मनोहर दरवडे, संजय भिंगारदिवे, राजू चंगेडिया, प्रांजली सपकाळ, सुनिता वराडे, संगीता सपकाळ, उषाताई ठोकळ, मीना ससाणे, सुषमा पाटील, ज्योती भिंगारदिवे, कुसुमबाई धाडगे, लता वाघस्कर, ह.भ.प. मायाताई गोरखा, सरिता शिंदे, भारती कटारिया, सुरेखा आमले, ह.भ.प. रेखाताई मडावी, माधवी माळगे, सुप्रिया रासकर, पूजाताई मडावी, पठाण मॅडम, श्रद्धा मडावी, सुरेखा बागल, शीतलताई मडावी, कुलदीप भगवाने, मायरा दरवडे, अनिता शेलार, महिमा माळगे आदी उपस्थित होते.

महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या आरोग्याची काळजी घेणारे असे उपक्रम अत्यंत आवश्‍यक आहेत. महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. दातांचे आरोग्य हे एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. हरदिन मॉर्निंग ग्रुपने घेतलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत होते.


डॉ. अतुल मडावी म्हणाले की, दातांची योग्य निगा न राखल्यास अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नियमित दात तपासणी करणे, योग्य पद्धतीने ब्रश करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्‍यक आहे. महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन महत्त्वाचे असून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे अधिकाधिक नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी महिलांच्या दातांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना योग्य उपचार व मार्गदर्शन देण्यात आले. दातांची निगा कशी राखावी, योग्य आहार व स्वच्छतेचे महत्त्व काय आहे याबाबतही महिलांना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच कार्यक्रमादरम्यान उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. अतुल मडावी व इंडियन डेंटल असोसिएशन अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष डॉ. ओंकार भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये दंतरोगांविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली, अनेक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.

याप्रसंगी तपेश्‍वर महादेव मंदिराचे सर्व पदाधिकारी, हरी ओम भजनी मंडळ तसेच भिंगार येथील सर्व महिला मंडळातील सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरानंतर उपस्थित महिलांना अल्पोपहाराचेही वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभिजीत सपकाळ, सुभाष पेंढुरकर, मुन्ना वाघस्कर, संतोष हजारे, रामनाथ गर्जे, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर अनावडे, योगेश हळगावकर, दशरथ मुंडे, सखाराम अळकुटे, सुरेश कानडे, मच्छिंद्र बेरड, राजू शेख, वेणूनाथ खर्डे, नंदू नायकू, पोपटराव शेंडे, गंगाधर ससाणे, भगवान दळवी, विजय जावळे, काशिनाथ साळुंके, अशोक लोंढे, कैलास भोकरे, सुनील देशपांडे, राजू कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *