• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

संविधान दिन नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस -ॲड. महेश शिंदे

ByMirror

Nov 27, 2025
संविधान दिन नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस -ॲड. महेश शिंदे

मेरा युवा भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय, जय युवा अकॅडमी, सावित्रीज्योती महोत्सव समिती, सूर्या मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संविधान दिवस साजरा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संविधानानुसार आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेने जीवन जगण्याचे अधिकार मिळाले. भारतीय नागरीकांसाठी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही. संविधानाने दिलेले मुलभूत अधिकार आपली ढाल बनून आपल्याला हक्क मिळवून देतात, नागरीकांमधे संविधानाप्रती आदराची भावना वाढविण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जात असल्याचे प्रतिपादन जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांनी केले.


मेरा युवा भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय, जय युवा अकॅडमी, सावित्रीज्योती महोत्सव समिती, सूर्या मॉर्निंग ग्रुप आंदींच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकूर्ती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ॲड. शिंदे बोलत होते. याप्रसंगी श्रीनिवास नागुल, ॲड. दिनेश शिंदे, किशोर पवार, सुरेखा सदगीर, कल्याणी गाडळकर, शाहीर वसंत डंबाळे, चंद्रकांत पाटोळे, भाऊसाहेब पादिर, सुनिल सकट आदींसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी बाळासाहेब पाटोळे, सुनिल सकट, शाहिर वसंत डंबाळे यांनी मार्गदर्शन करुन संविधानाचे महत्त्व विशद केले. संविधानाच्या उद्देशिकचे याप्रसंगी वाचन करण्यात आले. कार्यक्रमासाठी मेरा युवा भारतचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, प्रविण कोंढावळे, विशाल गर्जे, भाऊराव वीर, विशेष सरकारी वकिल ॲड. सुरेश लगड यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *