• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

भाजप मध्य मंडळाच्या वतीने वृक्षारोपणातून हरीत अहिल्यानगरचा संकल्प

ByMirror

Nov 25, 2025
महिला भगिनींच्या हस्ते सिद्धीबागेत वृक्षारोपण

महिला भगिनींच्या हस्ते सिद्धीबागेत वृक्षारोपण


डॉ. सुजय विखे यांच्या प्रेरणेने शहरात हिरवाईचा वसा -सुनिल सकट

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी मध्य मंडळाच्या वतीने शहरातील सिद्धीबाग परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आला. हरीत शहर सुरक्षित भविष्य या संकल्पनेला अनुसरून महिला व भगिनींच्या हस्ते आंब्याच्या रोपांची लागवड करण्यात आली. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा उपक्रम शहरात उत्साहात पार पडला.


भाजप मध्य मंडळाच्या चिटणीस सोनाली पाठक, हर्षदा पवार, हौसाबाई गोंधळे, आरती सकट, प्रिशा साळवे आदी महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तर लावलेल्या झाडाच्या संवर्धनाची देखील जबाबदारी घेण्यात आली. या वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन माजी मध्य मंडळाध्यक्ष अशोक भोसले व मध्य मंडळाध्यक्ष सुनिल सकट यांच्या पुढाकारातून करण्यात आले. या कार्यक्रमाला शालेय शिक्षक राहुल जाधव, संतोष शिरसाठ, लखन साळवे, गौरव पाचबैल, संतोष साळवे, श्‍लोक पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


सुनिल सकट म्हणाले की, डॉ. सुजय विखे हे जनतेच्या मनातील लोकप्रिय नेतृत्व आहे. खासदार म्हणून त्यांनी शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी उल्लेखनीय काम केले. त्यांनी शिक्षण व आरोग्य सेवांचा विस्तार केला असून ग्रामीण भागात अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि वैद्यकीय शिक्षण संस्था उभारून मानव संसाधन विकासासाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या प्रेरणेने आम्ही वृक्षारोपणाचा संकल्प केला असून ‘हरीत शहर सुंदर शहर’ हा उद्देश आम्ही सर्व मिळून पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


अशोक भोसले म्हणाले की, डॉ. सुजय विखे यांनी ‘जनसेवा युवा मंच’च्या माध्यमातून जिल्ह्यातील सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांना चालना दिली आहे. शहराचा विकास, रस्त्यांची उभारणी, शैक्षणिक सुविधा व सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्याच प्रेरणेने आज आम्ही सिद्धीबागेत वृक्षारोपण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे सिद्धीबाग परिसरात हिरवाईची वाढ होणार असून, पुढील काळात शहराला पर्यावरणपूरक बनवण्याचा निश्‍चय भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *