• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

केडगावच्या सरस्वती विद्यालयात वृक्षारोपण

ByMirror

Nov 24, 2025
हरित मोहिमेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

हरित मोहिमेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश


वृक्ष लावू या पर्यावरण वाचवू या -जालिंदर कोतकर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव येथील सरस्वती विद्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकीतून व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या उपक्रमाचा शुभारंभ उद्योजक जालिंदर कोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमात माजी सभापती मनोज कोतकर, केडगाव मंडळ अध्यक्ष भरत ठुबे, माजी नगरसेवक संभाजीराजे पवार, माजी नगरसेवक सुनील (मामा) कोतकर, अजित कोतकर, उमेश कोतकर, अशोक कराळे, सुनिल कोतकर, सुमित लोंढे, शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर, अवि साठे, शिवाजी मगर तसेच विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जालिंदर कोतकर म्हणाले की, केडगाव भागामध्ये डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामांची अंमलबजावणी झाली आहे. शाळेचे काँक्रिटीकरण, ओपन जिम, मुलांसाठी खेळण्याची साधने अशा विविध सुविधा शाळेला उपलब्ध करून देण्यात त्यांच्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. तसेच त्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना प्रेरणादायी संदेश दिला.


कोतकर पुढे म्हणाले की, निसर्ग मानवाला खूप काही देतो. त्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वृक्षारोपण. प्रत्येक विद्यार्थ्याने व नागरिकांनी एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. वृक्षारोपण म्हणजे केवळ झाड लावणे नव्हे; तर भविष्य सुरक्षित करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.


माजी सभापती मनोज कोतकर म्हणाले की, वृक्ष हीच खरी संपत्ती आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेत किमान एक झाड लावून त्याची जबाबदारी घ्यावी. पर्यावरण रक्षणाची सुरुवात शाळेतून झाली तर समाजात मोठा बदल घडू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सरस्वती विद्यालयाच्या आवारात छायादायी, फळझाडे व पर्यावरणपूरक प्रजातींची लागवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक संदीप भोर यांनी आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *