• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

भाजपा युवा मोर्चाच्या शहर सरचिटणीसपदी आकाश सोनवणे यांची नियुक्ती

ByMirror

Oct 14, 2025
विद्यार्थी संघटनेतून सक्रीय झालेले सोनवणे यांच्या कार्याची दखल

विद्यार्थी संघटनेतून सक्रीय झालेले सोनवणे यांच्या कार्याची दखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर भाजपा युवा मोर्चा शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आकाश सोनवणे यांच्याकडे शहर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


सोनवणे यांनी यापूर्वी युवा शहर उपाध्यक्ष पद त्याचबरोबर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वादग्रस्त ठरलेले कुलगुरू निवडी विषयाच्या वेळी महाविद्यालयीन युवा संघटनेच्या माध्यमातून तीव्र असे आंदोलन केले होते. त्यावेळेस त्यांना पोलिसांनी अटकही केली होती. एमपीएससी बारकोड पद्धत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. त्यावेळी त्यांनी न्यू आर्टस्‌ कॉलेज जवळ मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्‍न मार्गी लागला होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि जिल्हा लेबर फेडरेशनचे सदस्य बाळासाहेब सोनवणे आणि शेवगाव तालुक्यातील आखातवाडी येथील माजी सरपंच वर्षा सोनवणे यांचे ते पुत्र आहेत.


मोठा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेले आकाश सोनवणे नगर शहरातील राजकारणात सक्रीय झाले आहे. एमबीए उच्चशिक्षित असल्याने आणि सामाजिक कार्यातून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. भाजपा युवा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *