• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

जालिंदर बोरुडे यांचा लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

ByMirror

Jul 18, 2025
मोफत नेत्र शिबिर व नेत्र दान चळवळीतील कार्याची दखल

मोफत नेत्र शिबिर व नेत्र दान चळवळीतील कार्याची दखल

नगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचे काम करणारे फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


शहरात नुकताच झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांच्या हस्ते बोरुडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी यशवंत सेनेचे शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर, जिल्हाध्यक्ष विजय तमनर आदी मान्यवर उपस्थित होते.


जालिंदर बोरुडे फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 32 वर्षापासून शिबिर घेऊन हजारो गोरगरीब नेत्रदोष असलेल्या रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्या असून, या सेवेच्या माध्यमातून अनेकांना नवदृष्टी मिळाली आहे. तर नागरिकांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रोत्साहित करुन अनेकांचे मरणोत्तर नेत्रदान घडवून आनले आहे.

नेत्र शिबिराबरोबरच समाजाची गरज ओळखून विविध आरोग्य शिबिर फाऊंडेशनच्या माध्यमातून ते घेत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *