• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

ढवळपुरी येथील अवैध मुरूम उत्खननप्रकरणी नाशिक विभागीय आयुक्तांचे चौकशीचे आदेश

ByMirror

Jun 10, 2025
जिल्हाधिकाऱ्यांना काढले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना काढले आहे.


दंडात्मक रक्कम वसुल करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी

नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील गट नंबर 311 व 184 मधील अवैध मुरूम उत्खननप्रकरणी दंडात्मक रकमेच्या वसुलीच्या तक्रारची दखल घेत नाशिक विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांना सविस्तर चौकशी करून शासन नियमातील तरतुदीनुसार आवश्‍यक कारवाई करण्याचे लेखी आदेश काढले आहे.


गट नंबर 311 व 184 मधील अवैध मुरूम उत्खननप्रकरणी दंडात्मक रकमेची वसुली होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. या संदर्भात 28 एप्रिल 2025 रोजी प्रशासनाने 69 लाख व 3 लाख 45 हजार रुपयांच्या दंडात्मक नोटीस बजावल्या असून, आजअखेर संबंधितांकडून एकही रक्कम वसूल करण्यात आलेली नाही. समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनास आठ दिवसांची मुदत दिली असून, यानंतरही जर दंड वसूल न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देऊन, नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे देखील दाद मागितली होती. याची दखल घेऊन सदरील आदेश काढण्यात आला आहे.


ढवळपुरी येथील गट क्रमांक 311 आणि 184 मध्ये के. के. रेंज हद्दीत मुरुमाचे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले आहे. हे काम रस्त्यालगत दीर्घ काळापासून सुरु असून स्थानिक मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार सुरू राहिले.


21 एप्रिल 2025 रोजी झालेल्या तक्रारीनंतर, पारनेर तहसील कार्यालयाने गट क्रमांक 311 चे मालक राजेंद्र बाबुराव शेवते यांच्याविरोधात 69 लाख रुपयांची दंडात्मक नोटीस बजावली. तथापि, आजतागायत सदर रक्कम वसूल करण्यात आलेली नाही. शेवते यांनी त्यांचा खुलासा देताना, गटात इतर 23 शेतकरी कुटुंबांचा सहभाग असल्याचे नमूद केले. मात्र प्रशासनाने त्यांचा खुलासा अमान्य केला आहे.


गट क्रमांक 184 मध्ये देखील मुरुमाचे विनापरवाना उत्खनन करून पोल्ट्री फार्मसाठी भर टाकण्यात आली आहे. यामुळे भागाजी चौधरी व इतर संबंधितांवर 3 लाख 45 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, या रकमेचीही वसुली सात दिवस उलटूनही झाली नसल्याची माहिती आहे. गट नंबर 311, 314 व 184 या सर्व गटांची फेर तपासणी (पंचनामा) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांमार्फत करण्याची मागणी करण्यात आली आहे. तथापि, तहसील कार्यालयाकडून अद्याप कुठलीही कारवाई झालेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


गट नंबर 311, 314 व 184 चे फेर पंचनामे सार्वजनिक बांधकाम अभियंता अहिल्यानगर यांच्याकडून करण्याबाबत तक्रार करून आज अखेर फेरपंचनामे तहसील कार्यालय पारनेर यांनी जाणीवपूर्वक कुठलीही कारवाई केलेली नाही. गट नंबर 311 व 184 दंडात्मक कारवाईची रक्कम वसूल करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर रक्कम वसुल न झाल्यास उपोषणावर ठाम असल्याचे रोडे यांनी म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *