• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

प्रा. सुनिल धस यांचे आर.एस.पी. अधिकारी प्रशिक्षण पूर्ण

ByMirror

Jun 5, 2025
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान

नगर (प्रतिनिधी)- येथील प्रा. सुनिल चंद्रशेखर धस यांनी नुकतेच महाराष्ट्र राज्य गृह विभाग, पोलिस व शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण (आर.एस.पी.) अधिकारी हे दहा दिवसीय प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.


शहरातील पोलिस मुख्यालय येथे नुकतेच हे प्रशिक्षण पार पडले. सदर प्रशिक्षण पूर्ण करुन दिलेल्या विशेष योगदानाबद्दल प्रा. धस यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक कडूस, पोलिस निरीक्षक उमेश परदेशी, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, संस्थेचे राज्यस्तरीय अध्यक्ष संजय शेंडे, उपाध्यक्ष पितांबर महाजन, विभागीय समुपदेशक सिकंदर शेख, जिल्हा समुपदेशक सोमनाथ बोंतले, उप जिल्हा समुपदेशक प्रकाश मिंड, कवायत प्रशिक्षक मुसा सय्यद यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन केले .


प्रा. धस हे अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा येथे इंग्रजीचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या प्रशिक्षणातंर्गत  वाहतूक नियंत्रण, नागरी संरक्षण, मैदानी कवायत, अग्निशमन सेवा, प्रथमोपचार, योग, ध्यानधारणा व इतर आकस्मिक सेवा यांचे प्रशिक्षण देण्यात आले.


या अभ्यासक्रमात इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त व अनुशासन याचे धडे विशेष तासिका अंतर्गत मिळणार आहेत. प्रा. धस यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *