• Wed. Feb 5th, 2025

राज्यस्तरीय सावित्री-ज्योती गौरव पुरस्कार जाहीर

ByMirror

Jan 9, 2025

रविवारी पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते होणार वितरण

सागर ससाणे, ॲड. शारदा लगड, ॲड. सुमेध डोंगरे, गणेश बनकर, वसंत रांधवन यांना पुरस्कार

नगर (प्रतिनिधी)- दरवर्षी शहरात होणाऱ्या सावित्री ज्योती महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. आलेल्या प्रस्तावातून या वर्षीचे पुरस्कार सागर ससाणे, ॲड. शारदा लगड, ॲड. सुमेध डोंगरे, गणेश बनकर, वसंत रांधवन यांना निवड समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
रविवारी (दि.12 जानेवारी) गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी पद्मश्री पोपटराव पवार, खासदार निलेश लंके, समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. सुरेश पठारे, पुणे येथील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रशांत साळुंके, सुहासराव सोनवणे, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, स्वागत अध्यक्ष किशोर डागवाले उपस्थित राहणार आहेत. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार्थींचा सेमी पैठणी साडी, स्मृती चिन्ह व सन्मानपत्राने सन्मान होणार आहे.


सागर ससाणे हे शहरातील नामांकित एल ॲण्ड टी इलेक्ट्रिकल ॲण्ड ॲटोमेशन व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ते उच्चविद्या विभूषित असून, त्यांनी पीएचडी, एमबीए अशा पदव्या मिळवलेल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत व परिषदांमध्ये अनेक सुवर्णपदक प्राप्त केलेले आहे. औद्योगिक क्षेत्राचा 19 वर्षाचा अनुभव असून, अभियांत्रिकी महोत्सवात त्यांनी व्याख्यान दिलेले आहे. त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियर्स (इंडिया) चा प्रॉमिसिंग इंजिनियर अवॉर्ड देखील मिळालेला आहे.


ॲड. शारदाताई लगड या 32 वर्षापासून वकिलीक्षेत्रात कार्यरत आहेत. त्या सध्या अंबिका महिला सहकारी बँकेच्या चेअरमन असून, गेल्या 30 वर्षापासून महिलांच्या विविध प्रश्‍नांवर कार्यरत आहे. त्यांना योग विद्या धामचा योग साधने बद्दल महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. तसेच स्फुर्ती महिला आदर केंद्राच्या त्या संस्थापक अध्यक्ष असून, राजकीय क्षेत्रातही त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविलेली आहेत. सर्वसामान्यांना व महिलांना सातत्याने त्या कायद्याचे मार्गदर्शन करत असतात.


ॲड. सुमेध डोंगरे हे शिरूर (जि. पुणे) येथील विधीज्ञ असून, त्यांनी पीएचडी प्राप्त केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयात वकील व्यवसाय करतात. समाज भूषण सुलोचनाबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून, बहुजन चळवळीत विविध उपक्रमांचे आयोजन ते करत आहे.


गणेश बनकर हे नगर तालुक्यातील कामरगावचे भूमिपुत्र असून भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. ते संत सावता क्रांती परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष व क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहे. सर्व जातीय वधू-वर मेळावे, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, ग्राम विकासाच्या योजना, शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार सर्वसामान्यांपर्यंत करुन त्याचा लाभ मिळवून देत आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेल्या 15 वर्षापासून ते सातत्याने योगदान देत आहेत.


वसंतराव रांधवन पारनेर तालुक्यातील पत्रकार असून, निर्भिडपणे ग्रामीण भागातील प्रश्‍न मांडत आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालुका उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहे. समाज सुधारकांची जयंती साजरी करणे, विविध सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेऊन मागील 16 वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्य करत आहे.
सावित्री ज्योती महोत्सवाच्या पुरस्कार निवड समितीने पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावामधून सदरील पुरस्कार्थींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरी गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. पुरस्कार निवड समितीमध्ये प्रा. सुनिल मतकर, भीमराव उल्हारे, शिवाजी नवले, आरती शिंदे, रावसाहेब काळे, विनोद साळवे, निलेश रासकर, रावसाहेब मगर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *