• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

वांबोरीत श्री संत गुलाब बाबा चरित्र कथेला प्रारंभ

ByMirror

Feb 18, 2026
वांबोरीत श्री संत गुलाब बाबा चरित्र कथेला प्रारंभ

भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; धार्मिक सोहळ्यातून नैतिक मूल्ये, पर्यावरण संवर्धन आणि मानवतेचा संदेश

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे श्री संत गुलाब बाबा (काटेल धाम) यांच्या पवित्र चरित्र कथेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. या चरित्र कथेसाठी जिल्ह्यातील विविध भागांतून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. परिसरात नामस्मरण, भजन-कीर्तन आणि धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाविक अध्यात्मिक आनंदात तल्लीन झाले आहेत.


ध्वज पूजनाने कथेला चरित्र कथेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संतांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला. संत गुलाब बाबा यांच्या कार्याची, त्यागाची आणि भक्तांवरील कृपादृष्टीची महती कथाकारांनी भावपूर्ण शब्दांत मांडली. उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने कथा श्रवण करून आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला.


या प्रसंगी ह.भ.प. तुषार महाराज पाटील, संत गुलाब बाबा काटेल धामचे अध्यक्ष नंदू पालांदुरकर, दादासाहेब अल्मेडा (मुंबई), वनारसे महाराज (पुणे), गुलाबदास महाराज मंडलिक, शिवप्रसाद महाराज, पंडित सुदामराव तागड, बाबासाहेब रामनाथ वाकडे, भाऊसाहेब बनकर, भास्कर गवते, मच्छिंद्र गवते, पोपट पटारे, अरुण गवते, नवनाथ गवते, किरण गवते, ज्ञानदेव गवते, भाऊसाहेब तोगे, चांगदेव गवते, डॉ. अनिता भांड, लताबाई गवते, मुक्ताबाई गवते, सरस्वती वाकडे, सोनाली भांड, सविता जोशी, जिजाबाई पाचरणे, शांताबाई गवते, सत्यभामा गवते आदी मान्यवर उपस्थित होते.


कलियुगामध्ये संत गुलाब बाबा हे भक्तांवर अनन्य कृपादृष्टी ठेवणारे संत म्हणून ओळखले जातात. अनेक भक्त त्यांना “कलियुगातील भगवान श्रीकृष्ण” या नावाने संबोधतात. त्यांचे मूळ स्थान काटेल, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा येथे असून तेथे त्यांचे पवित्र धाम आहे. देशभरात चारधाम व त्यांच्या पाचव्या धामांची वर्णी करण्यात आली असून भारतभर कोट्यावधी भक्त त्यांच्या कार्याशी जोडले गेले आहेत.


संतांच्या प्रेरणेने विविध गावांमध्ये सप्ताह, हरिनाम सप्ताह, चरित्र कथा आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून समाजात नैतिक मूल्ये, पर्यावरण संवर्धन आणि मानवतेचा संदेश दिला जात आहे.
संत गुलाब बाबा भक्त व जागतिक पर्यावरण विकास सरकारचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरक्षनाथ विश्‍वनाथ गवते यांनी भाविकांना आवाहन केले की, अशा पवित्र चरित्र कथांचा लाभ घ्यावा आणि संतांच्या शिकवणीप्रमाणे आपण जीवन जगावे. पशुपक्षी जीव जगत व निसर्गावर प्रेम करावे संतांच्या कृपेने समाजात सद्भावना, सेवा वृत्ती आणि अध्यात्मिक जागृती वाढीस लागते, असे त्यांनी सांगितले.


वांबोरी येथे सुरू झालेल्या या चरित्र कथेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन आणि प्रवचनांचे आयोजन करण्यात येणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *