• Sat. Feb 8th, 2025

ज्ञानरचना सोशल फाउंडेशनला राष्ट्रीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर

ByMirror

Jan 9, 2025

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त संस्थेचा शहरात केला जाणार सन्मान

संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल

नगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक, सामाजिक व महिला सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्ञानरचना सोशल फाउंडेशन या संस्थेला राज्यस्तरीय राष्ट्रीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ध्येय उद्योग समूह व युवा ध्येयच्या वतीने रविवारी (दि.12 जानेवारी) राष्ट्रीय युवा दिनानिमित्त माऊली सभागृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संस्थेला पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष लहानु सदगीर यांनी दिली.
ज्ञानरचना सोशल फाउंडेशन शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान देऊन सुसंस्कारी व गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत आहे. सामाजिक समतेसाठी विविध उपक्रम राबवून भावी पिढीमध्ये लोकशाहीची मुल्ये रुजविण्याचे कार्य करत आहे.

सुप्रिया चौधरी, प्रविण साळवे, सारिका शेलार ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांद्वारे गरजूंना मदतीचा हात देण्याचे सातत्याने उपक्रम राबवित आहे. तसेच संस्थेच्या वतीने सामाजिक संस्थांना निधी संकलनासाठी व विविध मार्गदर्शनवर शिबिर आयोजित करुन सामाजिक चळवळीचा प्रचार-प्रसार केला जात आहे. संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या लोककल्याणकारी कार्याची दखल घेऊन ज्ञानरचना सोशल फाउंडेशन या संस्थेला राज्यस्तरीय राष्ट्रीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *