चौकशी करुन दोषींवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याची रिपाईची मागणी
क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे यांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसी नगर व पुणे विभागात सन 2015-16 मध्ये कनिष्ठ लिपिक, ड्रायव्हर, चौकीदार, लष्कर पदांसाठी एकाच कुटुंबातील नातेवाईकांची भरती झाली असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करुन दोषींवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सन 2015-16 मध्ये 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसीत कनिष्ठ लिपिक, ड्रायव्हर, चौकीदार, लष्कर पदांसाठी 32 जागांच्या भरत्या निघाल्या होत्या. सदर भरतीची शासकीय नियमाप्रमाणे कोणत्याही वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. या भरतीसाठी उमेदवारांची लेखी, तोंडी परीक्षा व मुलाखत नेमकी कुठे व कधी घेण्यात आली? याची संपूर्ण माहिती दिली जात नाही. नगरमधील वरिष्ठ लिपिक व पुणे विभागातील लिपिक हे दोन्ही चांगले मित्र असल्याने त्यांनी उपसंचालक यांच्या संगनमताने भरतीमध्ये मोठा गैरव्यवहार करून भ्रष्टाचार केला आहे. ही भरती संपूर्ण राज्याची होती, तर या भरतीमध्ये फक्त बारामती, पुणे व नगरचेच उमेदवार निवडले गेले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या भरतीमध्ये सदर लिपिकांच्या सर्व नातेसंबंधातील उमेदवार भरती झालेले आहेत. पूर्वी कनिष्ठ व सध्या वरिष्ठ लिपिक पदावर असलेला व्यक्ती मागील दहा वर्षापासून एकाच कार्यालयामध्ये कार्यरत आहे. त्यांची अद्याप पर्यंत बदली झालेली नाही. त्यांचे नातेवाईक देखील सहा ते सात वर्षापासून एकाच कार्यालयात कार्यरत आहे. त्यांची देखील जिल्हाबाहेर बदली झालेली नाही. लिपिक पदी भरती झालेल्या त्या व्यक्तीच्या अनुभवाचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन, टंकलेखन प्रमाणपत्र सुद्धा तपासण्याची गरज आहे. त्या वेळचे त्यांच्याकडे पुरावे नसतील तर त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
राजकीय हितसंबंध असल्याने सदर व्यक्ती प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सन 2015-16 मध्ये 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसीत पद भरतीची सखोल चौकशी व्हावी, एकाच विभागामध्ये सर्वच नाते संबंधातील कर्मचारी कार्यरत झाले असताना या प्रकरणी गांभीर्याने चौकशी करुन त्यांची बदली करावी व दोषींवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे यांच्या कार्यालया समोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सावित्री ज्योती महोत्सवाचे 9 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी संयोजन समितीचे ॲड. महेश शिंदे, सुहासराव सोनवणे, रावसाहेब काळे, दत्ता वामन, मेजर शिवाजी वेताळ, राजकुमार चिंतामणी, हमीदभाई शेख, मिया शेख, अरुण ढाकणे, प्रा. संजय पडोळे, बाळासाहेब पाटोळे, रजनी ताठे, आरती शिंदे, विद्या शिंदे आदीं उपस्थित होते.
आमदार जगताप शहर विधानसभेच्या मतदार संघात तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांचा सावित्री ज्योती महोत्सव संयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सुहासराव सोनवणे म्हणाले की, बचत गटातील महिलांसाठी नवनवीन व्यवसाय प्रशिक्षण, कच्चामाल, वाहतूक व्यवस्था, व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजना, भांडवल, उद्योग उभारणी, बाजारपेठ आणि मार्केटिंगच्या ज्ञानासाठी हा महोत्सव उपयुक्त असल्याचे सांगितले.
दरवर्षीप्रमाणे महोत्सवात बचत गट स्टॉल, वस्तू विक्री प्रदर्शन, बचत गटांच्या उत्पादनांचे विविध स्टॉल, सर्व जातीय वधू-वर मेळावा, वीर पत्नींचा गौरव, मोफत आरोग्य शिबिर, लोककला सादरीकरण, युवक-युवतींसाठी विविध स्पर्धा, कवी संमेलन, व्याख्यान, ब्युटी टॅलेंट शो, लहान मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा चार दिवस मेजवाणी राहणार आहे. या महोत्सवात बचत गटातील महिलांना सहभागी होण्याचे आवाहन ॲड. महेश शिंदे यांनी केले.
अहमदनगर महानगरपालिका, जय स्वयंसेवी संस्था संघटन, जिल्हा क्रीडा कार्यालय, समाजकार्य महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, रयत प्रतिष्ठान, जय युवा अकॅडमी, उडान फाउंडेशन, समग्र परिवर्तन युवा बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून हा महोत्सव घेण्यात येणार आहे. महोत्सव संयोजनासाठी जयश्री शिंदे, मीना म्हसे, अश्विनी वाघ, दिनेश शिंदे, पोपट बनकर, गणेश बनकर, रावसाहेब मगर, सुनील मतकर, सागर अलचेट्टी, अनंत द्रविड, कल्याणी गाडळकर, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. पुष्पा जेजुरकर, मेजर भीमराव उल्हारे, ॲड. प्रशांत साळुंके प्रयत्नशील आहेत.
