• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

चर्मकार विकास संघाचा महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा

ByMirror

Nov 18, 2024
चर्मकार विकास संघाचा महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा

शहरात संत रविदास विकास केंद्र उभारण्यासाठी आ. जगताप यांनी महत्त्वाचे योगदान दिले -संजय खामकर

नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना चर्मकार विकास संघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. चर्मकार समाजातील विविध प्रश्‍न सोडवून समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी योगदान देत असल्याबद्दल आ. जगताप यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. यावेळी चर्मकार विकास संघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, विनोद कांबळे, दिनेश देवरे, संदीप सोनवणे, स्वप्निल खामकर, संतोष कांबळे, अभिषेक कांबळे, रुपेश लोखंडे, दिलीप कांबळे, दीपक खेडकर, दगडूमामा पवार, शंकरनाना सुडके, किरण दाभाडे, भाऊ पुंड, संदीप सुडके, स्वप्निल बोरुडे, अक्षय जाधव, दादा पांडुळे आदी उपस्थित होते.


संजय खामकर म्हणाले की, शहरात चर्मकार समाजाचे संत रविदास विकास केंद्र उभारण्यासाठी आ. जगताप यांनी महत्त्वाचे योगदान दिले. एक एकर जागेत हा प्रकल्प उभा राहत असताना 90 लाख रुपयांचा निधी त्यांच्या पाठपुराव्याने मिळाला. त्यांचे सातत्याने चर्मकार समाजासाठी भरीव योगदान राहिले आहे. चर्मकार समाजाच्या सुख-दुःखात ते नेहमी सहभागी असतात.

चर्मकार बांधवांना महापालिकेच्या माध्यमातून पिचपरवाना मिळण्यासाठी त्यांनी सहकार्य केले. कोरोना काळात त्यांनी सर्व समाजासाठी केलेले कार्य दीपस्तंभाप्रमाणे केले. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या नेतृत्वाला पुन्हा संधी देण्यासाठी चर्मकार समाज एकवटणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *