• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

शिवसेनेच्या मुख्यमंत्री वैद्यकिय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश कराळे राष्ट्रवादीत दाखल

ByMirror

Nov 16, 2024
शिवसेनेच्या मुख्यमंत्री वैद्यकिय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश कराळे राष्ट्रवादीत दाखल

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते स्विकारली शहर जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी

नगर (प्रतिनिधी)- येथील शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्यमंत्री वैद्यकिय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख अनिकेत सुरेश कराळे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत दाखल झालेले कराळे यांची शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या प्रचार सभेत खासदार सुळे यांनी कराळे यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, उमेदवार अभिषेक कळमकर, दिलीप सातपुते, विक्रम राठोड, दीप चव्हाण, बाळासाहेब बोराटे, किसनराव लोटके, योगीराज गाडे, दत्ता जाधव, गारूडकर सर आदी उपस्थित होते.


अनिकेत कराळे शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकिय मदत कक्षाची जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी अनेक गरजू रुग्णांना वैद्यकिय मदत मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे काम केले. सर्व समाजात त्यांचा जनसंपर्क असून, मोठ्या संख्येने युवा वर्ग त्यांच्याशी जोडलेला आहे. मराठा महासंघाच्या माध्यमातून देखील त्यांचे सामाजिक कार्य सुरु आहे. शिवसेनेच्या पदाचा राजीनामा देऊन, ते राष्ट्रावादीत दाखल झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या पत्रान्वये त्यांची शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


कराळे यांनी सर्व समाजात कार्य करताना पक्षाची संघटनात्मक बांधणी केली जाणार आहे. तर सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे स्पष्ट करुन पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *