• Sun. Jun 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

आंतर शालेय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत रंगले अटीतटीचे सामने

ByMirror

Nov 14, 2024
रेहान तांबोळी ने केली गोलची हॅट्रीक

ऑक्झिलियम, ओऍसीस, आठरे पाटील, डॉन बॉस्को श्री साई स्कूलची विजयी घौडदौड

रेहान तांबोळी ने केली गोलची हॅट्रीक

नगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे स्टेअर्स फाउंडेशन व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर शालेय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत खेळाडूंचे रंगतदार सामने होत आहे. 14 व 17 वर्षे आतील मुलांच्या सामन्यांना प्रारंभ झाले असून, खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनाने अटीतटीच्या सामन्यांचा थरार पहावयास मिळत आहे.
युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय (भारत सरकार) आणि राष्ट्रीय खेळ संवर्धन संस्था (एनएसपीओ) यांच्या मान्यतेने चार दिवसीय ही स्पर्धा घेण्यात आली आहे. 14 वर्षा आतील संघात ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, ओऍसीस, आठरे पाटील स्कूल व 17 वर्षा आतील संघात डॉन बॉस्को आणि श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलने विजय मिळवून आघाडी घेतली. तर डॉन बॉस्कोचा खेळाडू रेहान तांबोळी याने गोलची हॅट्रीक नोंदवली.


14 वर्षे आतील मुलांमध्ये कर्नल परब विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलने 0-1 गोलने विजय मिळवला. या विजयासाठी स्वराज जाधव यांनी केलेला 1 गोल महत्त्वाचा ठरला.
ओऍसीस विरुध्द प्रियदर्शनी पब्लिक स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात ओऍसीसचे खेळाडू शिवम दळवी, ओम पवार व आयुष जेवे यांनी प्रत्येकी 1 गोल करुन 3-0 गोलने प्रियदर्शनी पब्लिक स्कूलवर दणदणीत विजय मिळवला. ओऍसीसच्या आक्रमक खेळी पुढे प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही.
आर्मी पब्लिक स्कूल (एमआयआरसी) विरुध्द आठरे पाटील पब्लिक स्कूल यांच्यात शेवट पर्यंत सामना रंगला होता. यामध्ये आठरे पाटीलचे खेळाडू ओम लोखंडे व शशांक गर्जे यांनी प्रत्येकी 1 गोल करुन 2-0 गोलने आर्मी पब्लिक स्कूलचा पराभव केला.


17 वर्षे आतील मुलांमध्ये डॉन बॉस्को विरुध्द माऊंट लिटरा स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात डॉन बॉस्को संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन 4-0 गोलने विजय संपादन केले. या सामन्यात डॉन बॉस्कोचा खेळाडू रेहान तांबोळी याने गोलची हॅट्रीक करुन संघाच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. तर सिध्दांत कराळे याने 1 गोल केला.
श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल विरुध्द पंडित नेहरु विद्यालय यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलचा खेळाडू अमार शेख व स्वराज सुर्यवंशी याने प्रत्येकी 1 गोल केला. प्रतिस्पर्धी संघाला एकही गोलचे खाते उघडता आले नाही. 2-0 गोलने श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलचा संघ विजयी ठरला. स्पर्धेचे पंच म्हणून सागर चेमटे, शशी गायकवाड, जोएल पिल्ले, ओम दंडवते, परेश म्याना, प्रणव पंडित, ऋषी कनोजिया काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्टेअर्स फाउंडेशनचे अध्यक्ष विजय कमलनाथ (टायरवाले), उपाध्यक्ष डॉ. प्रताप पटारे, विल्सेंट फिलिप्स, सचिव प्रसाद पाटोळे, सहसचिव सुभाष कनोजिया, खजिनदार मयूर टेमक, निलेश हराळे, वृषाली पटेकर, जावेद शेख परिश्रम घेत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *