• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ वृक्षरोपणासाठी ग्रामस्थांना 62 झाडांचे वाटप

ByMirror

Oct 21, 2024
निस्वार्थ देशभक्ताला श्रद्धांजलीचा उपक्रम -शिवाजी पालवे

जय हिंद फाऊंडेशनचा पुढाकार

निस्वार्थ देशभक्ताला श्रद्धांजलीचा उपक्रम -शिवाजी पालवे

नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने स्व. रतन टाटा यांच्या स्मरणार्थ वृक्षरोपणासाठी 30 चिंच, 31 जांभळ व 1 गोरख चिंचच्या झाडांचे वाटप करण्यात आले. नगर तालुक्यातील उदरमल येथे हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाप्रसंगी जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, भास्कर गर्जे, सुदाम पालवे, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ औटी, उदरमल गाव शाळा समितीचे अध्यक्ष सोमनाथ पालवे, पांडुरंग जाधव, विठोबा गीते, विश्‍वासराव पालवे, ऋषिकेश पालवे, ज्ञानदेव पालवे, ऋषिकेश गिते, अभिषेक आव्हाड, उद्धव पालवे, शिवम आव्हाड आदी उपस्थित होते.


शिवाजी पालवे म्हणाले की, पद्मभूषण रतन टाटा हे देशातील सर्वसामान्यांच्या मनातील उद्योजक होते. त्यांनी फक्त पैश्‍यासाठी व्यवसाय केला नाही, तर आपल्या नफ्यातून सर्वसामान्य वर्गासाठी आधार देण्याचे काम केले. त्यांनी देशात अनेक समाजोपयोगी कार्य केले. देशावर आलेल्या संकटाप्रसंगी त्यांनी मोलाचे सहकार्य केले. जीवनात कमवलेल्या संपत्तीपैकी मोठा हिस्सा त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी लावला. निस्वार्थ देशभक्ताला फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रध्दांजली देण्यासाठी त्यांच्या नावाने रोपं देऊन वृक्षारोपणाचे आवाहन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *