• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश आंबेडकर यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

ByMirror

Oct 18, 2024
निधन झालेल्या व्यक्तीच्या नावाने वृक्षारोपणाची मोहिम चालविणाऱ्या युवकाला वृक्षारोपणाने श्रध्दांजली

निधन झालेल्या व्यक्तीच्या नावाने वृक्षारोपणाची मोहिम चालविणाऱ्या युवकाला वृक्षारोपणाने श्रध्दांजली

नगर (प्रतिनिधी)- व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाची मोहिम चालवणारे चर्मकार विकास संघाचे युवा शहर जिल्हाध्यक्ष निलेश आंबेडकर यांच्या निधनानंतर वृक्षारोपण करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. नुकतेच आंबेडकर यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची ही चळवळ अविरतपणे पुढे सुरु राहणार असल्याचा संकल्प चर्मकार विकास संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.


निलेश आंबेडकर यांच्या स्मरणार्थ वडगाव गुप्ता येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सोमा काते, आकाश देशमुख, जनार्दन उदमले, भाऊसाहेब आंबेडकर, सुभाष चिंधे, सामाजिक कार्यकर्ते श्‍यामराव पिंपळे, वडगाव गुप्ताचे सरपंच सोनूबाई शेवाळे, उपसरपंच विजय शेवाळे, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, किरण सोनवणे, दिलीप आंबेडकर, भाग्यश्री आंबेडकर, अशोक आंबेडकर, बबन आंबेडकर, प्रतिभा आंबेडकर, सुवर्णा आंबेडकर, अर्चना आंबेडकर, नामदेव आंबेडकर, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, भाऊसाहेब गोरे, अनिल गोरे, जनार्दन साळे, संगीता देशमुख आदी उपस्थित होते.


संजय खामकर म्हणाले की, समाजकारणाला जोडलेला गेलेला निलेश आंबेडकर हा युवक होता. त्याने सातत्याने समाजातील वंचित घटकांना आधार देण्यासाठी योगदान दिले. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे युवकांचे उत्तमप्रकारे संघटन करुन विविध प्रश्‍न हाताळले. समाजाच्या विकासासाठी त्याचे सातत्याने योगदान सुरु होते. त्याच्या निधनाने एक युवा सामाजिक कार्यकर्ता हरपल्याचे दु:ख होत असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *