• Sat. Jul 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

मठाधीपती अशोक महाराज यांचा धार्मिक व सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

ByMirror

Sep 30, 2024
मठाधीपती अशोक महाराज यांचा धार्मिक व सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

धार्मिक क्षेत्रातील कार्याचा गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सद्गुरु शंकर शेठ महाराज मठाचे मठाधीपती अशोक दादा महाराज यांना राज्यस्तरीय धार्मिक व सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अशोक महाराज यांच्या धार्मिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


या सन्मान सोहळ्याप्रसंगी अनापवाडी शाळेचे मुख्यध्यापक सागर घोलप सर ,अशोक बडवे सर , कृष्णा उरणकर, प्रकाश वाघ, सुरज वाघ, ओंकार रासकर, दर्शन गाडळकर, तेजस चांडवले, तेजस तळेकर, दत्ताभाऊ बडवे आदींसह सेवेकरी वर्ग उपस्थित होते. अशोक दादा महाराज यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *