• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

कवियत्री सरोज आल्हाट यांना राज्यस्तरीय आयडॉल महाराष्ट्र पुरस्कार प्रदान

ByMirror

Jul 25, 2024
कवियत्री सरोज आल्हाट यांना राज्यस्तरीय आयडॉल महाराष्ट्र पुरस्कार प्रदान

30 वर्षातील साहित्यिक, सामाजिक व पत्रकारितेमधील उल्लेखनीय कार्याचा गौरव

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कवियत्री, लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना आयडॉल महाराष्ट्र 2024 पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर येथे सन्मानित करण्यात आले. आधुनिक केसरीच्या वतीने साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.


ऐतिहासिक एमटीडीसी येथील मिथिकल पार्क, एलोरा केव्स येथे झालेल्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात सेवानिवृत्त माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते आल्हाट यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध कवी व गीतकार डॉ. दासू वैद्य, सुप्रसिध्द कवी इंद्रजीत भालेराव, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्लास्टिक सर्जन तथा आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ. उज्वला दहिफळे, आधुनिक केसरीचे डॉ. प्रभू गोरे, संजय व्यापारी आदी उपस्थित होते.


गेल्या 30 वर्षातील साहित्यिक, सामाजिक व पत्रकारितेमधील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन आयडॉल महाराष्ट्र 2024 पुरस्कार सरोज आल्हाट यांना प्रदान करण्यात आल्याचे डॉ. प्रभू गोरे यांनी सांगितले. आल्हाट यांना साहित्य व सामाजिक क्षेत्रातील राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *