विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या ग्रुपचे सदस्य व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार
ज्येष्ठ नागरिकांसह सदस्यांची आरोग्य तपासणी
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धन व योग-प्राणायामाने सदृढ आरोग्याची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपचा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस आरोग्याचा जागर करुन करुन साजरा करण्यात आला. तर विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या ग्रुपचे सदस्य व त्यांच्या गुणवंत पाल्यांचे सत्कार करण्यात आले.
भिंगार येथील देशमुख सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार अनिलराव तोरडमल, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग श्रीगोंदाचे उपअभियंता गणेश भोसले, पीएसआयपदी निवड झालेली आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा वराडे, उद्योजक लॉरेन्स स्वामी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रास्ताविकात हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी हरदिनचे पाचशे पेक्षा जास्त सभासद आरोग्य व पर्यावरण चळवळीत योगदान देत आहे. तर गरजू घटकांना आधार देण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे. वर्षभर वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, योग शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना मदत आदी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली. प्रारंभी दिपप्रज्वलाने कार्यक्रमाचे प्रारंभ झाले. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे यांचे आरोग्य विषयावर प्रवचन झाले. त्यांनी उपस्थितांना सुदृढ आरोग्यासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले.
नायब तहसीलदार अनिलराव तोरडमल म्हणाले की, मनुष्य किती जगला यापेक्षा तो कसा जगला? याकडे समाज बघतो. सामाजिक संवेदना जागरुक ठेऊन वाटचाल केल्यास आत्मिक समाधान मिळते. कर्माने परमार्थ घडतो, यासाठी कर्म चांगले असणे गरजेचे आहे. शरीर सदृढ असल्यास प्रत्येक क्षेत्रात यश गाठता येते. तर व्यायामाने मन प्रफुल्लीत होऊन बुध्दी एकाग्र होते. हरदिन मॉर्निंग ग्रुपची पर्यावरण संवर्धन व आरोग्य चळवळ समाजाला दिशा देणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवापूर्ती बद्दल एस.टी. महामंडळातून सेवानिवृत्त झालेले शेषराव पालवे, लष्करातून सेवानिवृत्त झालेले सिताराम परदेशी, हाज यात्रा करणारे प्रा. सलाबत खान, साऊथ आफ्रिका येथे कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करणारे योगेश खरपुडे, तबलावादनात विशेष नैपुण्य मिळविणारे वेदांत केदारे, पुरस्कार प्राप्त शर्मिला मेहेत्रे, ज्योतिषाचार्य तुषार धाडगे, अकाऊंट सेक्टर मधील क्लास वन अधिकारीची परीक्षा उत्तीर्ण झालेली स्नेहा खोत, पीएसआय झालेली पूजा वराडे, दहावीतील गुणवंत श्रावणी कटोरे यांचा सत्कार करण्यात आला.
महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत बिनविरोध झालेले सुंदरलाल भंडारी, कांतीलालजी बोरा, नितीन शिंगवी, सुशील भंडारी, विनोद भंडारी, पवन गुंदेचा, सनी मुनोत, सुदाम गांधले, शंकरराव हिरणवाळे, वैशाली बोरा तसेच महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेतील नूतन संचालक शिवाजीराव बनकर, अशोक दळवी आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे विठ्ठलराव लोखंडे, सुभाष होडगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जालिंदर बोरुडे, सुमेश केदारे, जहीर सय्यद, रमेश वराडे, दिलीपराव ठोकळ, सर्वेश सपकाळ, सचिन चोपडा, दिलीप गुगळे, अभिजीत सपकाळ, दीपक धाडगे, अशोकराव पराते, मनोहर दरवडे, दीपक बडदे, अनंत सदलापूर, एकनाथ जगताप, दशरथराव मुंडे, पोपट भांड, नामदेव जावळे, सुभाष पेंढूरकर, जालिंदर अळकुटे, राजू कांबळे, प्रांजली सपकाळ, सुनीता वराडे, सीमा केदारे, संगिता सपकाळ, ऐश्वर्या परदेशी, उषा ठोकळ, संगीता दरवडे, मीना ससाणे, आशाताई पराते, वंदना मेहेत्रे, आरतीताई बोराडे, स्नेहल दरवडे आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रुपमधील सदस्यांची डॉ. सोमेश्वर गायकवाड यांनी मधुमेह व हृदयरोग तपासणी केली. त्याचप्रमाणे डॉ. अकबर मनियार, डॉ. प्रवीण साबळे, डॉ. अमित पठारे आदींसह बुथ हॉस्पिटलच्या टिमने उच्च रक्तदाब, मधुमेह आदी विविध आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज आनावडे यांनी केले. आभार एकनाथ जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत कटोरे, रमेश खंडेलवाल, दिलीप बोंदर्डे, बाळू पाटील, सचिन पेंढूरकर, अतुल वराडे, संजय नायडू, सरदारसिंग परदेशी, अनिल सोळसे, अविनाश जाधव, अविनाश पोतदार, संजय भिंगारदिवे, रमेश कोठारी, जयकुमार मुनोत, सिद्धेश्वर पारेकर, अविनाश काळे आदींनी परिश्रम घेतले.
