• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

राष्ट्रीय बहुजन सभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

ByMirror

Apr 15, 2024

महामानवांनी समाजातील उपेक्षीत घटकांना नेहमीच आधार दिला -प्रकाश थोरात

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय बहुजन सभेच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय बहुजन सभेचे अध्यक्ष प्रकाश थोरात, संदिप पवार, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता संजय गायकवाड, ब्राम्हणे, संजय मंडलिक, जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे आदी उपस्थित होते.


प्रकाश थोरात म्हणाले की, महापुरुषांच्या विचाराने त्यांची जयंती साजरी होण्याची गरज आहे. महामानवांनी समाजातील उपेक्षीत घटकांना नेहमीच आधार दिला. त्यांचा कार्याचा वारसा पुढे चालविण्यासाठी युवकांनी त्यांचे विचार अंगीकारण्याची गरज असून, समाजात महापुरुषांचे विचार आचरणात आल्यास सर्वांगीन विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *