• Mon. Aug 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

केडगावला रंगली लंडन किड्स प्री स्कूल शाळेची शिवजयंती मिरवणूक

ByMirror

Mar 28, 2024

शिवरायांची वेशभूषा परिधान करणारे 21 बालके ठरली मिरवणुकीचे आकर्षण

अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित लंडन किड्स प्री स्कूलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या मिरवणुकीने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. हातात भगवे ध्वज तसेच शिवकालीन वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

मिरवणुकीतील शिवाजी महाराजांची पालखी आणि तब्ब्ल 21 विद्यार्थ्यांनी साकारलेल्या शिवकालीन वेशभुषेने सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व महापुरुषांच्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झाले होते.


शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. शाळेपासून शंभो गार्डन ते ओंकार नगर पासून शाहूनगर बस स्टॉप व नंतर पुन्हा शाळेत असा मिरवणूक मार्ग होता. मिरवणुकीत विद्यार्थ्यांसह संस्थेचे सचिव संदीप भोर, ज्ञानसाधना गुरुकुल चे संचालक प्रसाद जमदाडे, शाळेच्या प्राचार्य रुचिता जमदाडे, निशिगंधा गायकवाड, सुप्रिया मुळे, कल्याणी शिंदे, प्रतिभा साबळे, सपना साबळे, रुक्मिणी साबळे, मीना गायकवाड, पूर्वा ढोरसकर, नक्षत्रा ढोरसकर, समीक्षा लहाने, किरण खांदवे, विठ्ठल नगरे, अथर्व माताडे, यश गायकवाड आदी सहभागी झाले होते. मिरवणूक पाहण्यासाठी पालक व नागरिकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *