• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

अनिता काळे यांचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरव

ByMirror

Jan 23, 2024

महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत झालेल्या कार्यक्रमात काळे यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, उद्योजक बाळासाहेब शहाणे, ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, साहेबराव बोडखे, सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, डॉ. सुलभा पवार, साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, गणेश भगत, जालिंदर बोरुडे आदी उपस्थित होते.


अनिता काळे या सामाजिक क्षेत्रात मागील दोन दशकापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करुन शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण मोहिम चालवित आहे. महिला सक्षमीकरणाचे कार्य करुन उत्तम प्रकारे महिला संघटन केले आहे. व्याख्यानातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार घराघरात पोहचवून सक्षम पिढी घडविण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *