• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने अभिवादन

ByMirror

Dec 7, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी च्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, ज्येष्ठ नेते विजय भांबळ, युवक जिल्हा सरचिटनिस दया गजभिये, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, युवा नेते शनेश्र्वर पवार, युवक शहराध्यक्ष निखिल साळवे, भिंगार युवक शहराध्यक्ष महेश भिंगारदिवे, युवक तालुका सरचिटनिस निखिल सुर्यवंशी, युवा नेते आकाश सरोदे, युवा नेते संदीप वाघचौरे, मा.सरपंच युवराज पाखरे, रोहित आनंद कांबळे, गौरव पंडागळे, मयूर केदारे, किशोर शिंदे आधी उपस्थित होते.

युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनाची क्रांती घडून दिन दलितांना न्याय मिळवून दिलेला आहे. सन्मानाने जगण्याचा अधिकार त्यांच्यामुळे मिळाला असून देशात समता व न्यायव्यवस्था प्रस्थापित केल्याची भावना व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी तळागाळापर्यंत वंचित घटकांसाठी डॉ. बाबासाहेबांच्या विचार व प्रेरणेने काम करत असल्याचे सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *