• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

नेत्रदान व अवयवदानच्या जनजागृतीने महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन

ByMirror

Dec 7, 2023

फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा विद्युत महावितरण कार्यालयात उपक्रम

महापुरुषांचा आदर्श समोर ठेऊन सर्वांनी नेत्रदान व अवयवदान चळवळीत योगदान द्यावे -प्रकाश खांडेकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्युत महावितरण कार्यालयात नेत्रदान व अवयवदानची जनजागृती करण्यात आली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या नेत्रदान व अवयवदान चळवळीला प्रतिसाद देत महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला.


मरावे परी नेत्र रुपी उरावे… हा संदेश देत राबविण्यात आलेल्या कार्यक्रमास महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता दिपक लहामगे, लक्ष्मण काकडे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता लोखंडे, सुजाता नगराळे, उपकार्यकारी अभियंता शरद माने, धिरज गायकवाड, व्यवस्थापक रेणुका सूर्यवंशी आदींसह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर म्हणाले की, महापुरुषांनी समाजातील उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी जीवन वेचले. त्यांचा आदर्श समोर ठेऊन नेत्रदान संकल्प फॉर्म भरून नव्हे, तर प्रत्यक्ष मृत्यूनंतर जवळच्या नेत्रदान व अवयवदान केल्यास खऱ्या अर्थाने महापुरुषांना अभिवादन ठरणार आहे. समाजात नेत्रदान व अवयवदानाची जागृती होण्याची गरज असल्याचे सांगितले. तर त्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.


जालिंदर बोरुडे म्हणाले की, निसर्गाने दिलेली अनमोल ठेव म्हणजे डोळा असून, डोळ्याने जीवनाचा खरा आनंद घेता येतो. रोज मरणाऱ्या एका व्यक्तीचे डोळे दान केल्यास जवळपास सर्वच अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे अवयवदानाद्वारे अनेक गरजूंना नवजीवन जगता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक विद्युत कर्मचारी संघटनेचे सर्कल सचिव अनिल तिजोरे यांनी केले. नेत्रदूत बोरुडे यांनी यावेळी नेत्रदान व अवयवदानाचे संकल्प अर्ज भरुन घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *