• Wed. Jun 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

जय भगवान युवा प्रतिष्ठानच्या वतीने नाना डोंगरे यांना आदर्श कार्यगौरव पुरस्कार प्रदान

ByMirror

Oct 26, 2023

आमदार निलेश लंके यांनी केले डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक

अहमदनगर (प्रतिनिधी)- जय भगवान युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना आमदार निलेश लंके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. निंबादैत्य नांदूर (ता. पाथर्डी) येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी सावित्रीबाई फुले संस्थेचे आनंदजी सानप, उद्योजक बाबासाहेब ढाकणे, राजा दौंड, एपीआय आशिष शेळके, संजय गायकवाड, व्याख्याते विठ्ठल कांगणे, आयोजक संस्थेचे प्रमुख आजिनाथ दहिफळे, रामदास महाराज दराडे, युवक काँग्रेसचे स्मितल वाबळे, पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकनाथ पालवे आदी उपस्थित होते.


आमदार निलेश लंके यांनी पै. नाना डोंगरे यांच्या विविध क्षेत्रात सुरु असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन योग्य माणसाची पुरस्कारासाठी निवड केल्याचे स्पष्ट केले. यावेळी आजिनाथ दहिफळे यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले. डोंगरे यांचे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे.

ग्रामीण भागात वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. डोंगरे यांनी जिल्हा पातळीवर स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविले. व्यसनमुक्तीचे उपक्रम राबवून युवकांना दिशा देण्याचे कार्य सुरु आहे. विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, काव्य व युवा संमेलन घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य ते करत आहे. या सर्व उपक्रमाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात येत असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक आजिनाथ दहिफळे यांनी सांगितले.


सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे यांनी भगवानबाबांच्या पावन भूमीत पुरस्कार पहिल्यांदाच मिळाल्याचा आनंद होत आहे. या पुरस्काराने सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *